scorecardresearch

‘या’ अभिनेत्रीने पादचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, गुन्हा दाखल

पोलिसांनी कार जप्त केली असून चौकशी सुरु आहे

तेलुगू अभिनेत्री रश्मी गौतम सध्या अडचणीत सापडली आहे. रश्मी गौतमने एका पादचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली असून तो गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पादचाऱ्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून रश्मी गौतमची कार जप्त केली आहे.

17 मार्च रोजी रश्मी गौतम आपली नवी कार घेऊन फिरण्यासाठी बाहेर गेली होती. रश्मी गौतम वेगाने कार चालवत होती. यावेळी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पादचाऱ्याला कारने उडवलं. विशाखापट्टणम येथील कुरमन्नापेलम येथे हा अपघात झाला. अपघात होताच जखमी झालेल्या व्यक्तीला तेथे उपस्थित लोकांनी सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तिथून त्याला विशाखापट्टणम येथील खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं.

पोलिसांनी रश्मी गौतमविरोधात गुन्हा दाखल केला असून तिची कार जप्त केली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये रश्मी गौतमची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. रश्मी गौतमने 2002 रोजी तेलुगू चित्रपट ‘होली’ मधून पदार्पण केलं होतं. तिने तामिळ, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. चित्रपटांमध्ये रश्मी गौतमला फारसं यश मिळालं नाही. पण अँकरिंगने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. 2007 मध्ये रश्मी गौतमने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. आतापर्यंत तिने 10 रिअॅलिटी शोचं अँकरिंग केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Telugu actress rashmi rams car into pedestrian

ताज्या बातम्या