चित्रपटाचं प्रमोशन हे त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी किती महत्त्वाचं असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येक निर्माता आणि त्यांची पीआर टीम त्यांचा चित्रपट जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. यासाठी वेगवेगळी पोस्टर्स, टीझर, ट्रेलर, गाणी यांच्या माध्यमातून चित्रपटाची हवा केली जाते. हे टीझर आणि ट्रेलर्स अनोख्या पद्धतीने प्रदर्शित केले जातात.

नुकतंच सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा या आगामी चित्रपटाचे पोस्टरही हजारो फुट उंचावर विमानातून स्काय डायव्हिंग करत प्रदर्शित केले होते. ‘गजनी’चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तर खुद्द आमिर खानने सक्रिय सहभाग घेत रस्त्यावर उतरून लोकांचे केस त्यांना खास गजनी कट केल्याचं आपण पाहिलं आहे. असे वेगवेगळे हातखंडे वापरुन चित्रपटांचं होणारं प्रमोशन आपण पाहिलं आहे, पण एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात स्मशान भूमीपासून होणार असल्याचं सांगितलं तर तुमच्या कपाळावर नक्कीच आठ्या येतील ना? हो पण हे खरं आहे.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आणखी वाचा : काळ्या साडीतील करिश्मा तन्नाचा मादक लूक व्हायरल; चाहत्याने केली थेट डेटसाठी विचारणा

एका दाक्षिणात्य चित्रपटाचा टीझर हा चक्क स्मशानभूमीत प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. आगामी तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपट ‘गीतांजली मल्ली वचिंडी’च्या निर्मात्यांनी व प्रमोशनल टीमने याचा टीझर स्मशानभूमीत प्रदर्शित करायचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. २०१४ मध्ये ‘गीतांजली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आता तब्बल दहा वर्षांनी याचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘कोना फिल्म कार्पोरेशन’ यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर याबद्दल ट्वीट शेअर करत यांच्या ट्रेलर लॉंच सोहळ्याबद्दल माहीती दिली आहे. २४ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजता बेगमपेट स्मशानभूमीत हा टीझर प्रदर्शित केला जाणार असं त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत असा प्रयोग कधीच झालेला नाही त्यामुळे सगळ्यांचेच डोळे या ट्रेलर लॉंच सोहळ्याकडे लागले आहेत.

२०१४ मध्ये आलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या सीक्वलसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. कोना वेंकट यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर शिवा थुरलापती यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.