‘तुने मेरी जाना’फेम गायकाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

आतापर्यंत ९.६ कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सोशल मीडियामध्ये सध्या अनेक गाण्यांचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येतात. त्यामुळे कोणतं गाणं हिट ठरेल यामध्ये चढाओढ लागलेली असते. सध्या याच चढाओढीमध्ये ‘तुने मेरी जाना’फेम गायक गजेंद्र वर्माने बाजी मारली असून त्याच्या नव्या गाण्याचा व्हिडिओ तुफान गाजत आहे. या व्हिडिओला कमी कालावधीमध्ये सर्वाधिक व्ह्युज मिळाले आहेत.

गजेंद्र सिंहने ‘इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता’ या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ शेअर होताच केवळ ४ मिनीट २५ सेकंदामध्ये त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडला. तर आतापर्यंत ९.६ कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री करिश्मा शर्मा झळकली असून विक्रम सिंहने या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे सुरेंद्र कुकरेजा निर्मित या गाण्याचे बोल गजेंद्रने स्वत: लिहीले आहेत.

दरम्यान, या गाण्यापूर्वी गजेंद्रचं ‘तुने मेरे जाना’ हा अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. या गाण्याला दोन कोटी व्ह्युज मिळाले होते. ‘इसमें तेरा घाटा..’ या गाण्यामुळे सध्या सोशल मीडियावर #TeraGhata हा ट्रेन्डही सुरु झाला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tera ghata song garners 96 million views