Thaai Kizhavi Box Office Collection : दाक्षिणात्य चित्रपट नेहमी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. त्यांचे विषय, मांडणी आणि कौटुंबिक गोष्टी प्रेक्षकांची पसंती मिळवतात. अलीकडे तर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. अशातच आता अजून एक दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. एवढंच काय तर फक्त १० दिवसांत त्यानं ३६३ टक्के नफा कमावला आहे.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे ‘थाई किझवी’ (ThaaiKizhavi) २७ फेब्रुवारी रोजी ‘थाई किझवी’ चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित झाला. शिवकुमार मुरुगेसन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, त्यांनी या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटातून त्यांनी अनेकांचं लक्ष वेधलं आहे. या चित्रपटानं किती कमाई केली आणि याची कथा नेमकी काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

१० दिवसात कमावले कोट्यवधी

‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार जगभरात ‘थाई किझवी’नं ५१ कोटींचं कलेक्शन केलं आहे. तर भारतात या चित्रपटानं ४१.७० कोटी कमावले आहेत. तर परदेशात (ओव्हरसीज) ९.३० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटानं भारतात ३५.४० कोटींचे नेट कलेक्शन केलं असून, या कमाईमुळे चित्रपटानं निर्मात्यांना सुमारे ३६३ टक्के नफा मिळवून दिला आहे. या चित्रपटाचं आता बजेट वसूल झालं असून, त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

‘थाई किझवी’नं पहिल्या दिवशी ८० लाख रुपयांची कमाई केलेली. दुसऱ्या दिवशी ४.७५ कोटींची, तर तिसऱ्या दिवशी ४.८० कोटी व चौध्या दिवशी २.५ कोटी इतकं कलेक्शन केलं. त्यानंतरसुद्धा चित्रपटानं कोट्यवधींमध्ये कमाई केली. पाचव्या दिवशी चार कोटी, सहाव्या दिवशी ३.५० कोटी, सातव्या दिवशी २.७५ कोटी आणि आठव्या दिवसी २.७० कोटींचं कलेक्शन केलं आहे. नवव्या दिवशी चित्रपटानं ३.७५ कोटी व १० व्या दिवशी ३.३० कोटी कमावले.

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर हा एक कॉमेडी चित्रपट आहे. कड्डुपट्टीगावात राहणाऱ्या एका सामान्य साहुकार पावुनुथायी मृत्यूच्या उंबरठ्यावर असते.त्यांची प्रकृती खराब झाल्यानतंर त्यांची तिन्ही मुलं कुठल्याही परिस्थितीत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण- त्यांना संपत्ती मिळवायची असते. चित्रपटात राधिका सरथकुमार मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात सिंगमपुली, अरुलदोस, मुनीशकांत, बाला सरवनन व इलावरसु यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांत आहेत.