Trisha Krishnan Thalapathy Vijay TVK Results 2026: तामिळनाडूच्या राजकारणात आज थलपती विजयने इतिहास रचला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये विजयचा ‘TVK’ पक्ष १०६ जागांवर आघाडीवर असून त्याने प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला आहे. विजयच्या या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर, त्याच्याबरोबर अफेअरची चर्चा असलेली अभिनेत्री त्रिशा कृष्णन आज त्याच्या चेन्नईतील निवासस्थानी पोहोचली. एएनआयने (ANI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्रिशाची गाडी चाहत्यांच्या गर्दीतून विजयच्या घराच्या दिशेने जाताना दिसत आहे. मागील अनेक महिन्यांपासून विजय आणि त्रिशाच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. विजयची पत्नी संगीताने केलेल्या आरोपानंतर या जोडीच्या भेटीगाठींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज विजयच्या राजकीय विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्रिशा तिथे पोहोचल्याची चर्चा आहे.
मागील अनेक महिन्यांपासून थलपती विजय व अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहेत. विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिने त्याचे अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला. या संपूर्ण प्रकरणानंतरही त्रिशा व विजय एका रिसेप्शन सोहळ्याला ट्विनिंग करून पोहोचले होते. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप जाहीरपणे काहीच भाष्य केलेलं नाही. पण आता निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर त्रिशा विजयच्या घरी गेली. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एएनआयने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्रिशाची गाडी गर्दीतून विजयच्या चेन्नईतील घरी पोहोचली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
पाहा त्रिशा कृष्णनचा व्हिडीओ
दरम्यान, त्रिशा व विजय यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच काळापासून होत आहे. त्रिशा विजयबरोबरचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिने त्याला आपला बेस्ट फ्रेंड म्हटलंय. इतकंच नाही तर सुख असो वा दुःख विजय नेहमीच बरोबर असतो, असंही तिने म्हटलं होतं. दुसरीकडे विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिने काही महिन्यांपूर्वी घटस्फोट मागितला. विजयचे अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा आरोप तिने केला. त्याने हे नातं संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजूनही तो त्या नात्यात असल्याचा दावा संगीताने केला होता. विजयचं त्रिशा कृष्णनबरोबर अफेअर आहे, असं म्हटलं जातंय, पण दोघांनीही याबद्दल अधिकृत बोलणं टाळलंय. अशातच टीव्हीकेला तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत यश मिळालंय, त्या पार्श्वभूमीवर त्रिशा विजयच्या घरी पोहोचल्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
