scorecardresearch

थलपथी विजयच्या ‘वरिसु’चा जगभरात डंका, प्रदर्शनाच्या ३ दिवसांतच ‘इतका’ गल्ला जमवत पार केला १०० कोटींचा आकडा

थलपथी विजयचा ‘वरिसु’ चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला.

थलपथी विजयच्या ‘वरिसु’चा जगभरात डंका, प्रदर्शनाच्या ३ दिवसांतच ‘इतका’ गल्ला जमवत पार केला १०० कोटींचा आकडा

सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक बड्या चित्रपटांची टक्कर होताना दिसतेय. ‘वेड’ ‘कुत्ते’ आणि ‘वरिसु’ हे चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांना घेऊन येण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. पण या सगळ्यात थलपथी विजयच्या ‘वारीसू’ या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली आहे.

थलपथी विजयचा ‘वरिसु’ चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. गेली अनेक महिन्यांपासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. इमोशनल फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन यांचे मिश्रण असलेल्या या चित्रपटात विजय पुन्हा एकदा पूर्वीच्या अंदाजात दिसून येत आहे. आता या चित्रपटाने जगभरातून मोठाच गल्ला जमवला आहे.

आणखी वाचा : जॉन अब्राहम शाहरुख खानवर नाराज? अभिनेत्याच्या कृतीने वेधलं लक्ष

चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरवरही प्रतिक्रिया देत प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्रदर्शनाच्या तीन दिवसातच या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरातून १०३ कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘वरिसु’ १०० कोटींचा आकडा पार करणारा थालापती विजयाची दहावा चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा : लग्झरी गाड्या ते सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता; जाणून घ्या थलपथी विजयच्या संपत्ती बद्दल

वामशी पेडिपल्ली दिग्दर्शित या चित्रपटात थलपथी विजय एका व्यावसायिकाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपटगृहात इतर चित्रपटांना चांगलीच टफ फाईट देताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 11:13 IST

संबंधित बातम्या