सलमान खान आणि सोहेल खान या खान बंधूंच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सर्वांची मनं जिंकून गेला. बऱ्याच प्रतिक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला चाहत्यांनी स्टेटस, वॉट्सअॅप, इन्स्टास्टोरी, फेसबुक आणि सोशल मीडियावरील शक्य त्या सर्वच माध्यमांतून दाद दिली. मुख्य म्हणजे सलमानच्या अभिनयानं पुन्हा एकदा सर्वांना भावूक केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे जर ट्रेलरच इतका प्रभावी असेल तर संपूर्ण चित्रपटातून एक सुरेख कथानक प्रेक्षकांसमोर सादर होण्याची चिन्हं आहेत, असं म्हणायला हरकत नाही. सर्वांशी खेळीमेळीने वागणाऱ्या या अभिनेत्याच्या आयुष्यातील काही गंभीर प्रसंगांवेळी त्याचेही अश्रू अनावर झाले होते, त्याच्याही भावनांचा बांध फुटला होता, असं खुद्द सलमाननेच सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाच एका प्रसंगाविषयी सांगताना सलमान म्हणाला, ‘त्यावेळी माझे बाबा, आई आणि काका मला भेटण्यासाठी कारागृहात आले होते. माझ्या काकांनी मला बऱ्याच दिवसांनंतर पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी मला ‘तू कसा आहेस?’ असं विचारलं. त्यावर मी म्हणालो, मी मजेत आहे. हा फक्त ‘वन बेडरुम सूट’ आहे, छान आहे. ते ऐकताच माझे काका रडू लागले.’ सलमानच्या त्या अनपेक्षित उत्तराने त्याचे काका फार भावूक झाले होते.

Watch Tubelight Trailer Video : ‘एलईडी’चं ठाऊक नाही, तूर्तास ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर पाहा

त्या प्रसंगाविषयी सांगत सलमान म्हणाला, ‘काकांना रडताना पाहून माझे बाबा त्यांना म्हणाले, अरे तू कसला पठाण आहेस, जा इथून बाहेर जा तू. तो प्रसंग खूप भावूक होता.’ ‘ट्युबलाइट’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान सलमानने त्याच्या आयुष्यातील या प्रसंगावरुन पडदा उचलला. यावेळी चित्रपटात काम करण्याचा अनुभवही त्याने सर्वांसोबत शेअर केला. काही भावनिक दृश्यांच्या वेळी आपल्या अश्रूंना रोखणं शक्य नव्हतं, असं सांगत चित्रपटात अशी बरीच दृश्यं असल्याचंही स्पष्ट केलं.

कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामध्ये सलमान आणि सोहेल हे दोघंही सात वर्षांनंतर स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्या दृष्टीनेही फारच महत्त्वाचा आहे. सलमा खान आणि सलमान खान यांची निर्मिती असलेला हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच २३ जूनला प्रदर्शित होणार आहे.’

‘ट्युबलाइट’ सिनेमातील सलमान- माटिनची मस्ती पाहिली का?

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: That one day when bollywood actor salman khans family visited him in jail tubelight trailer
First published on: 26-05-2017 at 12:22 IST