scorecardresearch

शाहरुखची लेक आणि सैफचा मुलगा ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा देखील या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

suhana khan, suhana khan age, shahrukh khan daughter, suhana khan photos, aryan khan with suhana khan, suhana khan image, suhana khan bollywood debut, suhana khan movie, amitabh bachchan grand son, agstya nanda, shweta nanda, nvya naveli nanda, saif ali khan, saif ali khan son, ibrahim ali khan,

बॉलिवूड कलाकारांसोबतच त्यांची मुले कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. हे स्टार किड्स बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. ती दिग्दर्शिका जोया अख्तरच्या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

जोया अख्तर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने तिचा आगामी चित्रपट ‘द आर्चीज’ची नुकतीच घोषणा केली आहे. हा चित्रपट आर्ची कॉमिक्सवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आणखी वाचा : जगासमोर येणार कंगनाचा जोडीदार; अभिनेत्रीनेच दिले संकेत, म्हणाली, “तुम्हाला लवकरच…”

जोयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आर्ची कॉमिक्सचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये चित्रपट नेटफ्सिवर प्रदर्शित होणार असल्याचे आहे. त्यामुळे तरुणांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. पण चित्रपटात कोणते स्टारकिड्स दिसणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या निमित्ताने जोया अख्तर आणि रीमा कागती पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात चार मित्रांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात येणार आहे. हा एक म्युजिक ड्रामा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2021 at 10:30 IST

संबंधित बातम्या