तुषार कपूरच्या बाळाची पहिली झलक

फोटोत तान्हुला लक्ष्य त्याचे आजोबा म्हणजेच अभिनेता जितेंद्र यांच्यासोबत दिसतो.

लग्न न करता पितृत्व स्वीकारणा-या अभिनेता तुषार कपूरच्या बाळाचा पहिला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सरोगसी आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून तुषार बाबा झाला आहे. त्याने आपल्या बाळाचे नाव लक्ष्य ठेवले असून ही गोड बातमी प्रथम त्याची बहिण एकता कपूर हिने दिली होती.
दरम्यान, तुषारच्या तान्हुल्या बाळाचा आणि त्याच्या आजोबांचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या फोटोत तान्हुला लक्ष्य त्याचे आजोबा म्हणजेच अभिनेता जितेंद्र यांच्यासोबत दिसतो. सरोगसीद्वारे पिता होण्याची इच्छा असणाऱ्या तुषारच्या मुलाचा जन्म मुंबईमधील जसलोक रुग्णालयात डॉ. फिरोजा पारिख यांच्या देखरेखीखाली झाला. सेलेब्रिटी असलेल्या तुषारचा हा धाडसी निर्णय असल्याची भावना डॉ. फिरोजा पारिख यांनी व्यक्त केली. तुषार सतत मुलाची काळजी घेत असून, पिता झाल्याने तो अत्यंत आनंदित असल्याचे डॉ. फिरोजा म्हणाल्या. नातवाला पाहून आजोबा जितेंद्रदेखील खूप खुश आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The first photo of tusshar kapoors new born son