|| रेश्मा राईकवार

मॉडेलिंग, मालिका ते चित्रपट अभिनेत्री असा लांबचा पल्ला गाठणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकू र ही आजघडीला हिंदी चित्रपटांमधील यशस्वी अभिनेत्री म्हणून गणली जाते. अभिनयाची कु ठलीही पाश्र्वाभूमी नसताना अभिनय क्षेत्रातील इथवरचा प्रवास हा खचितच सोपा नव्हता. कु ठल्याही क्षेत्रात यश मिळाले की लोक खूश होतात, खरा आनंद हा यशापेक्षा तिथे पोहोचण्याच्या प्रवासात असतो. आपण आपल्या ध्येयपूर्तीसाठी परिश्रम घेऊन जी वाटचाल करत असतो ती माझ्यासाठी जास्त आनंददायी आहे, अशी भावना मृणालने व्यक्त के ली.

‘सुपर ३०’ आणि ‘बाटला हाऊस’ या दोन चित्रपटांनंतर तिचे ओळीने तीन मोठे चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. मात्र करोनामुळे या तिन्ही चित्रपटांचे प्रदर्शन सध्या रखडले आहे. महाविद्यालयात शिकत असतानाच मृणालने मालिके साठी ऑडिशन दिली होती. ती निवडली गेली आणि तिची या क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. वेळीच मालिकांमधून बाहेर पडत चित्रपटांचा मार्ग तिने चोखाळला. माझ्या सुदैवाने मला फार कमी वेळात निखिल अडवाणी, राके श ओमप्रकाश मेहरा, गौतम तिन्नोरीसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आता जे दिग्दर्शक आहेत त्या प्रत्येकाची विचारप्रक्रिया, त्यांची चित्रपट बनवण्याची शैली एकमेकांपासून भिन्न आहे. त्यांच्याकडून काम करता करता अनेक गोष्टी शिकता येतात. मी कलाकार म्हणून नवखी होते, पण यातल्या प्रत्येक दिग्दर्शकाने तू करू शकशील, असा विश्वास देत माझ्याकडून काम करून घेतलं आहे, असं ती सांगते. एक कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणूनही तुम्ही अशा प्रतिभावंत दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करत असताना अनेक गोष्टी शिकत असता. गौतम तिनौरी या ‘जर्सी’च्या दिग्दर्शकाक डूम मी शिस्त-नियम पाळायला शिकले. एखादे दृश्य किं वा घटनेचा भाव समजून घेऊन भूमिका करण्याचं तंत्र राके श ओमप्रकाश मेहरांनी शिकवलं. तर आपला आतला आवाज काय सांगतो ते ऐका आणि त्यानुसार वाटचाल करा हा मंत्र निखिल अडवाणींनी शिकवला, असं तिने सांगितलं.

मोठ्या पडद्यावर चमकण्याचं स्वप्न…

मृणालचे ‘तूफान’, ‘जर्सी’ आणि  ‘आँखमिचौली’ असे तीन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्यापैकी ‘तूफान’ हा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. कलाकार म्हणून लोकांनी आपल्याला मोठ्या पडद्यावर पहावं हे कोणाचं स्वप्न नसतं. करोनामुळे हे स्वप्न अर्धवट राहणार आहे, याबद्दल तिने खंत व्यक्त के ली. के वळ अभिनयच नाही तर मुळात चित्रपट हे मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठीच बनवले जातात. ‘तूफान’चंच उदाहरण घ्यायचं तर हा चित्रपट खेळावर आधारित आहे. पण या चित्रपटावर बारकाईने काम करत छोट्यातली छोटी फ्रे म वेगळ्या पध्दतीने टिपत जय ओझा यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण के ले आहे. या फ्रे म्सचं सौंदर्य तुम्हाला मोठ्या पडद्यावरच कळू शकतं, असं ती म्हणते.

हृतिकचा परफ्युम, शाहीदचं ध्यान

मृणालने हृतिक रोशन, शाहीद कपूर, फरहान अख्तर, परेश रावल अशा मोठमोठ्या आघाडीच्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. या प्रत्येक कलाकाराची आपली अशी एक अभिनयाची पध्दत आहे याविषयी ती गमतीने सांगते. हृतिक रोशन भूमिका करत असताना त्याच्या प्रत्येक व्यक्तिरेखेनुसार वेगळा परफ्युम वापरतो. हे मी आजवर कधीच ऐकलं नव्हतं. जसं पाऊस पडल्यानंतर येणारा मृद्गंध आपल्याला उत्साह देऊन जातो. तसंच त्या कथेनुसार तयारी करत असताना आपल्या इंद्रियांच्या संवेदनांचाही उपयोग करून घेता येतो, हे मी हृतिककडून शिकले. शाहीद आपली भूमिका उत्तम वठवण्यासाठी ध्यानधारणेवर भर देतो. तर फरहानचे जग संगीताभोवती गुंतलेले आहे. त्यामुळे दृश्य देण्याआधी तो शांतपणे गाणं ऐकणं पसंत करतो, असं ती  सांगते.

काम मिळेल का?

चित्रपटनिर्मितीची तंत्रही सध्या बदललेली आहेत. कलाकार यशस्वी असला तरी आपण जे चित्रपट निवडतो आहोत ते लोकांपर्यंत पोहोचतील का? त्यांना आवडतील का? माझी व्यक्तिरेखा लोकांनी खरी वाटेल का?, अशा अनेक गोष्टींचा काळजीपूर्वक विचार कलाकारांना करावा लागतो. एखादवेळी चित्रपट अजिबात वास्तवाला धरून नाही म्हणून मी चित्रपट नाकारल्यानंतर मला पुढे काम मिळेल ना?, ही भीती कायम सतावत असते. पण अशावेळीच खरी संयमाची परीक्षा असते. आपल्याला गुणवत्तापूर्ण काम करायचं असेल तर संयम आणि विवेकानेच काम करणं गरजेचं आहे. तरच या इंडस्ट्रीत टिकाव लागू शके ल, असं ती ठामपणे सांगते. अभिनयापुरतीच मर्यादित न राहता दिग्दर्शनातही आपल्याला रस आहे. मध्ये काही वेळ काढून चित्रपट दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेण्याचाही मानस असल्याचे मृणालने सांगितले. एक अभिनेत्री म्हणून इथवर झालेली वाटचाल ही आपल्या आईवडिलांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यांना माझ्या भूमिकांमधून निखळ आनंद मिळेल, चांगले काम के ल्याचा विश्वास वाटेल, अशाचपध्दतीने काम करत पुढची वाटचाल करायची आहे, असे तिने स्पष्ट के ले.