VIDEO: ‘The Jungle book’ च्या चित्रीकरणामागचे रहस्य..

‘The Jungle book’ चित्रपटाचा मेकींग व्हिडिओ डिन्सेकडून प्रदर्शित

'The Jungle book' चित्रपटाला भारतात चांगला प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाची भारतातील कमाई १६० कोटींच्या पुढे गेली आहे.

प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेल्या ‘The Jungle book’ चित्रपटाचा मेकींग व्हिडिओ डिन्सेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. एका घनदाट जंगलात घेतलेली सुसाट धाव आणि प्राण्यांसोबत केलेले सर्व सीन हे मोगलीने नेमके कसे केले, याचे रहस्य या व्हिडिओच्या माध्यमातून उलघडते. चित्रपटात मोगलीची भूमिका चिमुकल्या नील सेठीने साकारली आहे. मोगलीचे मानवी पात्र सोडले तर या संपूर्ण चित्रपटात फक्त प्राणीच आहेत. मात्र, चित्रीकरणादरम्यान एकही प्राणी सेटवर नव्हता. ग्राफीक्स आणि व्हीएफएक्सच्या साहाय्याने ‘जंगल बुक’चे चित्रीकरण करण्यात आले आहे. मेकींग व्हिडिओचा देखील चित्रपटाइतकाच थक्क करणारा आहे.
दरम्यान, चित्रपटाला भारतात चांगला प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाची भारतातील कमाई १६० कोटींच्या पुढे गेली आहे. ८ एप्रिल रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The jungle book making video

ताज्या बातम्या