“तेव्हा फक्त माझ्या पत्नीने माझी साथ दिली”; कठीण काळाच्या आठवणीने कपिल शर्मा भावूक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या शो चा होस्ट कपिल शर्मा त्याच्या सुरूवातीच्या काळाबद्दल बोलताना म्हणला…

kapilsharma
(Photo-Kapil Sharma Instagram)

‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. हा शो सगळ्यांना खळखळून हसवतो, यातील प्रत्येक पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. हे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. या शोचे आतापर्यंत ५०० हुन अधिक भाग झाले आहेत. अलीकडच्या भागात शोचा होस्ट कपिल शर्मा शोच्या सुरूवातीच्या काळा बद्दल बोलताना दिसला. त्या काळात आलेल्या संकटांवर कशा प्रकारे मात केली? सुपरहिट ठरलेला शो अचानक का बंद करावा लागला?, या बद्दल कपिलने त्याच्या भावना प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत.

या कठीण काळाबद्दल बोलताना तो म्हणाला ,” मला कोणीही माझा शो बंद करायला सांगितला नाही तो माझा निर्णय होता, करण लोकं माझ्यासामोर गोड बोलायचे आणि पाठीमागे चुगली करायचे.” त्या कठीण काळात अनेकांनी कपिलची साथ सोडली. मात्र त्याची पत्नी गिन्नी त्याचा मागे ठामपणे उभी होती. तो सांगतो, “माझी आई खेडेगावातून आलेली आहे. तिला डिप्रेशन काय असतं हे माहित नव्हतं. मी डिप्रेशनमध्ये आहे हे देखील मला मीडियाद्वारे कळले आणि त्यावेळी माझी पत्नी गिन्नीने मला प्रोत्साहन दिले आणि हा शो पुन्हा नव्याने सुरू केला.”

‘द कपिल शर्मा शो’ छोट्या पडद्यावर परतल्यावर पुन्हा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. दरम्यान, कपिल शर्मा शो पुन्हा एकदा अडचणीत आला. शोमध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृष्यावरून शिवपुरीच्या जिल्हा न्यायालयात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. एका एपिसोडमध्ये काही कलाकार दारू पित अभिनय करत असल्याचं समोर आल आहे. प्रत्येक बाटलीवर ‘दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे,’ असे लिहिलेले असताना देखील काही कलाकारांनी सेटवर मद्यपान केल्यामुळे त्यांच्यावर एफआरआय दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The kapil sharma show host kapil talked about his down fall and how his wife ginni helped her to overcome that aad

ताज्या बातम्या