नुकताच ‘भूत पुलिस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्यानंतर ‘भूत पुलिस’ चित्रपटाच्या टीमने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. दरम्यान सैफ अली खानने शोमध्ये एक किस्सा सांगितला तो ऐकून सर्वांना हसू अनावर झाले आहे.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी हजेरी लावली होती. बिझी शेड्युलमुळे अर्जुन कपूर शोमध्ये येणे शक्य झाले नाही. दरम्यान अर्चना पूराणसिंहने नुकताच वडील झालेल्या कपिल शर्मा आणि सैफ अली खानला त्यांचे आवडते अंगाई गीत कोणते असा प्रश्न विचारला. त्यावर सैफने दिलेल्या उत्तराने सर्वांना हसू अनावर झाले होते.

अर्चना पूराणसिंह यांना उत्तर देत सैफ म्हणाला, ते फक्त अॅलेक्सावरील अंगाई गीत ऐकतात. त्यानंतर कपिल म्हणाला की तो त्याच्या मुलीसाठी बेबी शार्क ट्यून लावत असतो. लहान मुलांना कोणतेही गाणे लावले तरी चालते. त्यांना कळत नाही. मी माझ्या दीड वर्षांच्या मुलील शार्क डू डू.. गाणे लावून देत असतो.

दरम्यान, सैफने सारा अली खान लहान असतानाचा एक किस्सा सांगितला आहे. ‘मी एक गाणे गात असे. ते एक इंग्रजी अंगाई गीत होते. त्यावेळी सारा खूप छोटी होती. मी ते गाणे गाऊ लागलो तेवढ्यात साराने डोळे उघडले आणि म्हणाली अब्बा कृपया गाणे गाऊ नका. तेव्हा पासून मी गाणं गाणे बंद केले. लहान मुलं पण मला गाणे गाऊ नको असे म्हणातत’ असे सैफ म्हणाला. ते ऐकून सर्वांना हसू अनावर झाले.