‘द कपिल शर्मा’शो हा सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो पैकी एक आहे. या शो मध्ये प्रत्येक वेळेस वेगवगेळे सेलिब्रेटी हजेरी लवतात. या वेळेस शो मध्ये तीन दिग्गज गायक उदित नारायण, कुमार सनू, अनुराधा पौडवाल विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. या खास एपिसोडमध्ये तिघेही त्यांच्या आयुष्याबद्दल, करिअरबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर करताना दिसले. तसंच एकमेकांची मस्करी करताना दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदित नारायण आणि कुमार सानू यांच्यात खूप घट्ट मैत्री आहे. ‘द कपिल शर्मा शो’ च्या नुकताच प्रसारित झालेल्या भागात कृष्णा अभिषेक धिरे धिरे से हे गाणं गात एन्ट्री घेतली. उदित नारायण सवतःला रोकू शकले नाहीत आणि मस्करीत कुमार सानू यांना टोमणा मारताना दिसले. ते म्हणाले, “धिरे धिरे जिंदगी में, किती आल्या आणि किती गेल्या आणि किती अजून बाकी आहेत. अजून मन भरलं नाही.”

कुमार सानू यांचे दोन वेळा लग्न झाले आहे, पाहिलं १९८० साली रिटा भट्टाचार्य आणि दुसरं सोनाली भट्टाचार्य सोबत. ते त्यांच्या पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये कपिलने मागच्या वेळेसच्या टॉवेलच्या किसयचा उलेख केला होता, ज्यावर उदित यांनी कपिला सडेतोड उत्तर ही दिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kapil sharma show udit naryan taunts kumar sanu about his love life aad
First published on: 20-09-2021 at 21:49 IST