scorecardresearch

विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ची बॉक्स ऑफिसवर घसरण, ११ व्या दिवशीची कमाई तब्बल…

हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. हा चित्रपटाचे अनेक प्रेक्षक फार कौतुक करत असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करत आहे. मात्र नुकतंच त्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईत पहिल्यांदाच घसरण पाहायला मिळाली. या चित्रपटाने ११ व्या दिवशी १२.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र गेल्या सोमवारच्या तुलनेत या सोमवारी या चित्रपटाने केलेली कमाईत १७ टक्के तोटा झाला आहे.

या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतरच्या पहिल्या सोमवारी १५ कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र त्यानंतर आता मात्र ११ व्या दिवशी या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने काल २१ मार्च रोजी १२.५० कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या सोमवारी या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली असली तरी हा चित्रपट अद्याप चांगली कमाई करताना दिसत आहे.

“२००१ मध्ये मला पहिल्यांदा…”, ‘Suicide Disease’शी झुंज देणाऱ्या सलमान खानने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने गेल्या ११ दिवसात १८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सध्या देशभरात ४ हजारहून अधिक स्क्रीनवर दाखवला जात आहे. तर ११ मार्च रोजी हा चित्रपट केवळ ७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The kashmir files box office collection drops on day 11 still remains rock steady on second monday nrp

ताज्या बातम्या