इस्त्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेल्या टीकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. नदाव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट अत्यंत बटबटीत आणि प्रचारपट असल्याचं मह्टलं आहे. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचं सत्य समोर आणणार असल्याची घोषणा केली आहे. आपण लवकरच ‘The Kashmir Files: Unreported’ प्रदर्शित करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

‘आज तक’शी बोलताना विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की “मी निश्चय केला आहे आणि आता तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून घोषणा करत आहे. आमच्याकडे अशा अनेक गोष्टी आणि किस्से आहेत ज्यावरुन आम्ही एक नाही तर १० चित्रपट बनवू शकत होतो. पण मला एकच चित्रपट बनवायचा होता. पण आता ‘The Kashmir Files: Unreported’ च्या माध्यमातून मी सर्व सत्य समोर आणणार आहे”.

Rekha intimate scenes with shekhar suman
४० वर्षांपूर्वी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर केले होते इंटिमेट सीन; आठवण सांगत म्हणाले, “मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना…”
annual session of china s top political advisory body
सगळे आलबेल असल्याची बतावणी?
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

‘काश्मीर फाइल्स’ प्रकरणी इस्रायलचा माफीनामा; लापिड यांनी केलेली टीका वैयक्तिक : राजदूत

विवेक अग्निहोत्री यांनी यावेळी हा चित्रपट असेल की वेब सीरिज याबद्दल स्पष्ट सांगितलं नाही. आपण सविस्तर माहिती लवकरच देऊ असं ते म्हणाले आहेत. “हा विषय कलेच्याही पलीकडचा असून, देशाच्या प्रतिष्ठेबाबत आहे. माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते मी लोकांसमोर आणावेत ही माझी नैतिक जबाबदारी आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.

इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे अध्यक्ष असलेल्या लापिड यांनी “काश्मीर फाइल्स चित्रपट अत्यंत बटबटीत आणि प्रचारपट आहे,” अशी टीका केली. इतक्या प्रतिष्ठित महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही असं लापिड म्हणाले.

IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला म्हटलं ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’; अनुपम खेर यांनी दिलं उत्तर, म्हणाले “असत्याची…”

दरम्यान नदाव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेली टिप्पणी हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनी म्हटलं आहे. लापिड यांच्या विधानामुळे भारत-इस्रायल संबंधांना धक्का बसला असला तरी या वादामुळे उलट दोन्ही देश अधिक जवळ येतील असा दावा त्यांनी केला.

विवेक अग्निहोत्री यांनी यावेळी लापिड यांच्या टीकेबाबत म्हटलं की “कोणत्याही हुशार व्यक्ती किंवा महान दिग्दर्शकाने काश्मीर फाइल्समधील एखादा सीन किंवा संवाद खरा नसल्याचं सिद्ध केलं तर मी चित्रपट बनवणं थांबवेन. जोपर्यंत कोणीही मला खोटं सिद्ध करु शकत नाही, तोपर्यंत मी चित्रपटांच्या माध्यमातून गोष्टी सांगणार”.