बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे.

विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहात इतरही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाचाच बॉक्स ऑफिसवर बोलबाला असलेला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी ७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर वाढवून २००० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. पाच दिवसांत या चित्रपटानं मोठा गल्ला जमवला आहे. पाचव्या दिवसाअखेर या चित्रपटानं एकूण ६० कोटी रुपयांची कमाई केली.

bad newz box office collection day 4
विकी कौशलसाठी ‘Bad Newz’; चित्रपटाने चौथ्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी, एकूण कलेक्शन किती?
Dharmveer 2
‘कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, धर्मवीरच्या ट्रेलरमधून राजकीय टोला
Katrina Kaif And Vicky Kaushal
‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी विकी कौशलबरोबर पत्नी कतरिना कैफची हजेरी; चाहते म्हणाले, “हे दोघे…”; पाहा व्हिडीओ
Kiley Paul's dance on Tauba Tauba song
किली पॉलचा बॉलीवूड चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तू टांझानियाचा विक्की कौशल…”
Kalki 2898AD
‘कल्की : २८९८ एडी’चा जगभरात जलवा! प्रभासच्या चित्रपटाने केला हजार कोटींचा टप्पा पार
deepika padukone and ranveer singh net worth
दीपिका पादुकोण-रणवीर सिंहची संपत्ती आहे ७४५ कोटी रुपये, दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण? जाणून घ्या
Ranveer Singh
कल्की चित्रपट पाहिल्यानंतर रणवीर सिंह पत्नी दीपिकाच्या भूमिकेबद्दल म्हणाला, “त्या प्रत्येक क्षणाला…”
July movie web series list
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ‘मिर्झापूर ३’सह प्रदर्शित होणार ‘हे’ सुपरहिट चित्रपट अन् वेब सीरिज, जाणून घ्या यादी

आणखी वाचा- ‘चंद्रमुखी’तील ‘दौलत’ आला समोर! मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल ४७. ८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर ५ व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पाचव्या दिवशी चित्रपटानं सर्वाधिक म्हणजेच तब्बल १८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे ६० कोटी रुपये एवढं झालं आहे. चित्रपटाच्या कमाईमध्ये होणारी वाढ पाहता हा चित्रपटच लवकरच १०० कोटी रुपयांचा आकडा पार करेल अशी आशा आहे.

आणखी वाचा- शिल्पा शेट्टीच्या कुटुबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. १२ मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळीही मोदींची चित्रपटाचं कौतुक केलं होतं. तसेच या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या या चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले जात आहे.