scorecardresearch

Premium

The Kashmir Files नंतर विवेक अग्निहोत्रींचा ‘दिल्ली फाइल्स’, ‘या’ विषयावर आधारित आहे आगामी चित्रपट

‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

vivek agnihotri

‘द कश्मीर फाइल्स’ ( The Kashmir Files) चित्रपटानं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri ) यांना प्रसिद्धीच्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या चित्रपटानंतर आता विवेक अग्निहोत्री प्रेक्षकांसाठी नवीन काय घेऊन येणार किंवा त्यांचा आगामी चित्रपट कोणता असणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं. पण आता विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. विवेक अग्निहोत्रींनी आता आगामी चित्रपट ‘दिल्ली फाइल्स’ ( The Delhi Files) वर काम करायला सुरुवात केली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मी सर्वांचे आभार मानतो ज्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ला एवढं प्रेम दिलं. मागची ४ वर्षं आम्ही या चित्रपटासाठी प्रामाणिकपणे काम केलं होतं. काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार सर्वांसमोर येणं गरजेचं होतं. पण आता मी नव्या चित्रपटाची तयारी करण्याची वेळ झाली आहे.’

rajveer deol
‘प्रादेशिक चित्रपट बोलके असतात’
nitin gadkri biopic
नितीन गडकरींचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहता येणार; चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर, प्रदर्शनाची तारीखही ठरली
shahid-kapoor-haider
‘या’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने घेतलं नव्हतं मानधन; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने सांगितलं कारण
Manoj Jarange Patil Film
मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, प्रतिक्रिया देत म्हणाले…

आणखी वाचा- “मी अशाप्रकारचे चित्रपट…” सोनू निगमनं सांगितलं ‘द कश्मीर फाइल्स’ न पाहण्याचं कारण

याशिवाय विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक ट्वीट करत त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचं नाव देखील सांगितलं आहे. ‘द दिल्ली फाइल्स’ हा विवेक अग्निहोत्रींचा आगामी चित्रपट असणार आहे.

आणखी वाचा- “माझ्या छोट्या केसांमुळे नकारात्मक…” मंदिरा बेदीनं केला धक्कादायक खुलासा

कोणत्या विषयावर आहे चित्रपट?

मिळालेल्या माहितीनुसार ‘द दिल्ली फाइल्स’ हा चित्रपट दिल्लीतील गुन्ह्यांच्या सत्य घटनांवर आधारित असणार आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्रींनी चित्रपटाची माहिती देताना एक ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहिलं, ‘सत्य लपवणं, न्याय नाकारणं आणि मानवी जीवनाला महत्त्व न देणं या गोष्टी आपल्या लोकशाहीवर कलंक आहेत. ‘द दिल्ली फाइल्स’मधून सर्वात बोल्ड आणि आपल्या या काळातील एक हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.’

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The kashmir files director vivek agnihotri announce upcoming film the delhi files mrj

First published on: 15-04-2022 at 18:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×