scorecardresearch

“कपिल शर्माने नकार दिला…”, ‘द काश्मीर फाइल्स’ प्रमोशन वादावर अनुपम खेर यांचा व्हिडीओ चर्चेत

कपिल शर्मा शोमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं प्रमोशन न करण्याच्या वादावर अनुपम खेर यांचा व्हिडीओ चर्चेत आहे.

the kashmir files, kapil sharma, vivek ranjan agnihotri, anupam kher, the kashmir files box office collection, kapil sharma show controversy, द कपिल शर्मा शो, कपिल शर्मा, अनुपम खेर, विवेक रंजन अग्निहोत्री, द काश्मीर फाइल्स, द काश्मीर फाइल्स प्रमोशन वाद
काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी 'कपिल शर्मा शो'वर काही गंभीर आरोप केले होते.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रमोशनच्या मुद्द्यावरून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला अनेक लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागालं. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ‘कपिल शर्मा शो’वर काही गंभीर आरोप केले होते. ज्यात त्यांनी शो मेकर्सनी चित्रपटात तगडी स्टारकास्ट नसल्यानं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलवलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यांचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर कपिल शर्मावर सोशल मीडियावरून प्रचंड टीका करण्यात आली होती. आता या सर्व वादावर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

कपिल शर्मानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जी एका मुलाखतीतील क्लिप आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर म्हणतात, ‘मी खरं सांगणार आहे. मला या शोसाठी विचारण्यात आलं होतं. पण मी माझ्या मॅनेजरला सांगितलं होतं की हा एक गंभीर चित्रपट आहे आणि तो एक कॉमेडी शो आहे त्यामुळे मी जाऊ शकणार नाही. कपिल शर्मानं नकार दिला नव्हता तर मी या शोसाठी नाही म्हटलं होतं. कारण या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असा कॉमेडी शो करणं मला योग्य वाटत नव्हतं.’

आणखी वाचा- प्रभासच्या ‘राधे श्याम’वर The Kashmir Files पडला भारी, तिसऱ्या दिवशी चित्रपटानं केली एवढी कमाई

अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना कपिलनं लिहिलं, ‘माझ्यावर करण्यात आलेल्या सर्व खोट्या आरोपांवर स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद अनुपम जी आणि त्या सर्व मित्रांचेही आभार ज्यांनी सत्य माहीत नसतानाही मला एवढं प्रेम दिलं. आनंदी राहा आणि हसत राहा.’

आणखी वाचा- “विवेक अग्निहोत्रीला याचे परिणाम भोगावे लागतील…”, ‘द काश्मीर फाइल्स’वर मनोज मुंतशिर यांचं ट्वीट चर्चेत

दरम्यान ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी कपिल शर्मा संदर्भात एक ट्वीट केलं होतं. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. या ट्वीटमध्ये त्यांनी, ‘चित्रपटात मोठी स्टार कास्ट नसल्यानं आम्हाला प्रमोशनसाठी मेकर्सनी नकार दिला.’ असं म्हटलं होतं ज्यावरून मोठा वाद झाला होता. त्यांचं हे ट्वीट बरंच चर्चेतही आलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The kashmir files film anupam kher reacts on kapil sharma show controversy video goes viral mrj