काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित असलेला चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजताना दिसत आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल असं बोललं जातंय. चित्रपट पाहिल्यावर अनेक सेलिब्रेटींनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशात आता करणी सेनेनंही या चित्रपटावर भाष्य केलं आहे. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल अम्मू यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे एक छोटासा आग्रह केला आहे.

करणी सेनेनं झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आग्रह केला आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून होणाऱ्या कमाईतील ५० टक्के हिस्सा हा काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावा. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल अम्मू म्हणाले, ‘बऱ्याच राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. ज्यामुळे सामान्य माणसांना सहजपणे चित्रपट पाहता यावा. तर मग आता निर्माता आणि दिग्दर्शक यांनी पुढे येऊन या चित्रपटाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम ही विस्थापित काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठी द्यावी.’

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..

आणखी वाचा- “…अन् तिथेच सर्व बिघडलं” ब्रेकअप आणि डिप्रेशनवर पहिल्यांदाच बोलला प्रतीक बब्बर

अम्मू पुढे म्हणाले, ‘जर निर्माता आणि दिग्दर्शक असं करण्यात अयशस्वी ठरले तर हे मानलं जाईल की, त्यांनी फक्त या लोकांच्या वेदना आणि जखमा पुन्हा एकदा ताज्या करण्यासाठीच हा चित्रपट तयार केला. या चित्रपटातून त्या लोकांचं कल्याण व्हावं असं त्यांना वाटत नव्हतं किंवा त्या लोकांच्या वेदनांची त्यांना अजिबात काळजी नव्हती.’

आणखी वाचा- “विवेक अग्निहोत्रीला याचे परिणाम भोगावे लागतील…”, ‘द काश्मीर फाइल्स’वर मनोज मुंतशिर यांचं ट्वीट चर्चेत

दरम्यान आतापर्यंत या चित्रपटानं ८७.४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.