पुष्पा २ चित्रपटाचे शुटींग ३ महिन्यांसाठी थांबवलंं; चाहत्यांना पाहावी लागणार वाट

पुष्पाचा चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता लवकरच पुष्पा २ चा ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

pushpa 1
पुष्पा २ चे शुटींग ३ महिन्यांसाठी थांबवले (संग्रहित छायाचित्र)

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ तेलगू चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. पहिला भाग सुपरहिट झाला असतानाच जगभरातील चाहते दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ मध्ये रश्मिका मंदाना आणि फहद फासिल विशेष भूमिकेत दिसणार आहेत. सध्या चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे.

हेही वाचा- अजय देवगणच्या ‘भोला’वर ‘हा’ दाक्षिणात्य चित्रपट पडणार भारी, पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

‘पुष्पा २’चा काही भाग काही महिन्यांपूर्वी विजानमध्ये शूट करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आता शुटींग थांबवण्यात आले आहे. ताज्या अपडेटनुसार, दिग्दर्शक सुकुमार सध्या ‘पुष्पा २’ च्या टीझरवर काम करत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी हा टीझर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. परंतु बॉलीवूड लाईफच्या बातम्यांनुसार, सुकुमार आतापर्यंत शूट केलेल्या सीन्सबद्दल असमाधानी आहे. असे म्हटले जात आहे की त्याने आतापर्यंत पुष्पा २ चे जे काही भाग शूट केले आहे ते हटवून रीशूट करण्याचा विचार करत आहे.

हेही वाचा- …म्हणून ‘बॉम्बे’ चित्रपटात काम न करण्याचा लोकांनी दिलेला सल्ला; मनीषा कोईराचा खुलासा

‘पुष्पा 2’च्या टीममधील हा गोंधळ आणखी तीन महिने कायम राहणार आहे. म्हणजेच अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’च्या शूटिंगसाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, अल्लू अर्जुन त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या शूटिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रश्मिका मंदान्ना बद्दल बोलायचे तर, तिने ‘पुष्पा २ ‘ व्यतिरिक्त आणखी दोन चित्रपट साइन केले आहेत. या चित्रपटासाठी ती लवकरच शूटिंगला सुरूवात करणार आहे, आता ‘पुष्पा २ शूटिंग लांबणीवर पडणार असल्याने चाहत्यांना चित्रपटाच्या रिलीजसाठीही बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 15:07 IST
Next Story
Video: “महेश मांजरेकर सर जेव्हा…” ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील कलाकारांचा व्हिडीओ शेअर करत उत्कर्ष शिंदे म्हणाला…
Exit mobile version