नागराज, कादंबरीच्या ‘दी सायलेंस’ने पटकावले बंगळूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे जेतेपद

‘दी सायलेंस’ हा चित्रपट सत्यकथेवर आधारीत आहे.

बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन मिळवल्यानंतर आता ‘दी सायलेंस’ ह्या चित्रपटाने बंगळूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१६ दरम्यान हा चित्रपट महोत्त्सव रंगला होता. या महोत्सवात आलेल्या चित्रपटांमधून ‘दी सायलेंस’च्या वेगळेपणासाठी या चित्रपटाला जेतेपद देण्यात आले.
जर्मन, ब्राझील, सिनेब्राझीलीया, इफ्फी आणि दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेतही ‘दी सायलेंस’ला नामांकने मिळाली होती. तर मामी फिल्म फेस्टिवलमध्ये ४ नोव्हेंबरला या चित्रपटाचे स्क्रिनींग करण्यात आले. नेहमीचं काहीतरी नवीन देऊ पाहणाऱ्या गजेंद्र अहिरेंचा ‘दी सायलेंस’ अशाच एका वेगळया विषयावर भाष्य करतो.
याआधी ‘दी सायलेंस’ने जर्मनमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये मान मिळवला आहे. या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरेंना जर्मन स्टार ऑफ इंडिया २०१५ च्या ‘डायरेक्टर्स व्हिजन’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. एस एम आर प्रोडक्शन्सचा ‘दी सायलेंस’ हा चित्रपट सत्यकथेवर आधारीत आहे. कोकणात राहणाऱ्या चिनीची व्यथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. आपल्या बाबांबरोबर राहणाऱ्या चिनीच्या आयुष्यातील एक काळा दिवस आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत करणाऱ्या त्या आठवणी दी सायलेंसमध्ये चित्रित करण्यात आल्या आहेत. दुष्कृत्य करण्यासाठी हपापलेले हात आणि त्यामुळे कोवळ्या जीवांची अकारण होणारी फरफट गजेंद्र अहिरेंचा ‘दी सायलेंस’ सांगून जातो.
समाजात वाढत चाललेल्या दुष्प्रवृत्तींवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात नागराज मंजुळे, कादंबरी कदम प्रमुख भूमिकेत दिसतील. हिंदीत नाव मिळवल्यानंतर अंजली पाटील पहिल्यांदाचं दी सायलेंस चित्रपटातून मराठी सिनेमात येत आहे. त्याशिवाय हिंदीतला गाजलेला चेहरा रघुवीर यादव आपल्याला मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तर ‘दी सायलेंस’ च्या निमित्ताने मुग्धा चाफेकर आणि वेदश्री महाजन हे नवीन चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
’दि सायलेसं’ च्या निमित्ताने इंडियन ओशन हा रॉक बँड मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे. असा हा दी सायलेंस लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The silence won bengaluru international film festival

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या