राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारून नावारूपाला आल्यानंतर ‘बबन’ चित्रपटामध्ये डॅशिंदेग भूमिकेत दिसलेला भाऊसाहेब शिंदे मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्या महत्त्वपूर्ण आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. ‘रौंदळ’ या चित्रपटातील मराठीसह हिंदूी भाषेतही प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं आहे.

‘भूमिका फिल्म्स ॲण्ड एंटरटेनमेंट’ या निर्मिती संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदेदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी आणि भाऊ शिंदेदे यांनी ‘रौंदळ’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गजानन नाना पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘रौंदळ’ या चित्रपटातील ‘मन बहरलं..’ हे लक्ष वेधून घेणारं नवं कोरं गाणं नुकतंच समाजमाध्यमाद्वारे प्रकाशित करण्यात आलं आहे. या चित्रपटात भाऊसाहेब शिंदेदे मुख्य भूमिकेत असून नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री त्यांच्या जोडीला आहे. हे गाणं गीतकार डॉ. विनायक पवार यांनी लिहिलं आहे. गायिका वैशाली माडेच्या सुमधुर आवाजात संगीतकार हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. पहिल्यावहिल्या प्रेमातील अबोल भावना या गाण्यात आहेत.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड डिझायनर महावीर साबन्नावरनं या चित्रपटाचं सिंक साऊंड आणि डिझाइन केलं आहे. डीओपी अनिकेत खंडागळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, फैझल महाडिक यांनी संकलन केलं आहे. पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचं असून, नृत्य दिग्दर्शन नेहा मिरजकर यांचं आहे. मंगेश भीमराज जोंधळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी चोख बजावली असून २०२३ मध्ये ‘रौंदळ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.