अभिनेता ईशान खट्टर नेहमी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपल्या भेटीला येत असतो. त्याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या आगामी ‘पिप्पा’ चित्रपटाची घोषणा करत तो यात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत असल्याचे सांगितले होते. अखेर आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यात ईशान खट्टर आणि मृणाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पिप्पा’ चित्रपटाचा हा टीझर मृणाल ठाकूर आणि ईशान खट्टर या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : …पण नियतीला ते मान्य नव्हते, ‘या’ कलाकारांना करायचे होते सैन्यदलात काम

या टीझरमध्ये ३ डिसेंबर १९७१ रोजी देशाच्या सैनिकांसह संपूर्ण देश रेडिओवर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना ऐकत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘काही तासांपूर्वीच पाकिस्तानने भारतीय हवाई तळांवर हवाई हल्ले केले. मी. भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी, पाकिस्तानशी युद्धाची घोषणा करते. जय हिंद….असा आवाज या टीझरमध्ये ऐकू येत आहे.

त्याचप्रमाणे या टीझरमध्ये मृणाल ठाकूर आणि ईशान खट्टर यांचेही एकत्र सीन्स दिसत आहेत. टीझरमध्ये ईशान युद्धभूमीवर दिसत आहे. यासोबतच टीझरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ही जाहीर करण्यात आली आहे. ईशान खट्टरचा ‘पिप्पा’ हा चित्रपट यावर्षी २ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : प्रियांका, आलिया आणि कतरिनासोबत ‘जी ले जरा’मध्ये झळकणार ‘हा’ अभिनेता; चर्चांना उधाण

‘पिप्पा’ हा एक युद्धपट आह. या चित्रपटात ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्या ‘द बर्निंग चाफीज’ या पुस्तकावर आधारित आहे. राजा कृष्ण मेनन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यात ईशान कॅप्टन बलराम सिंग मेहता यांची भूमिका साकारणार आहे. कॅप्टन बलराम सिंग मेहता हे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या पूर्व आघाडीवर लढले होते. या लढाया गरीबपूर येथे झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणून बांगलादेशची निर्मिती झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The wait is over pippa will get released on this day rnv
First published on: 15-08-2022 at 17:34 IST