एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण

बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकात गाजलेल्या अभिनेत्रींमध्ये महिमा चौधरीचेही नाव घेतले जाते.

महिमा चौधरी

बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकात गाजलेल्या अभिनेत्रींमध्ये महिमा चौधरीचेही नाव घेतले जाते. बॉलिवूडमधील खान अभिनेत्यांसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींमध्येही तिचे नाव येते. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘परदेस’ चित्रपटाने महिमाने शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २०१६ मध्ये तिचा ‘डार्क चॉकलेट’ हा शेवटचा चित्रपट आला होता. नुकतेच महिमाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फारशी पार्ट्यांमध्ये न दिसणारी महिमा नुकतीच एका कार्यक्रमाला हजर राहिली होती. यात ती बरीच जाड झाल्याचे दिसते.

वाचा : एकेकाळी ढाब्यावर काम करणारा हा अभिनेता आता कोट्यवधी संपत्तीचा मालक

४३वर्षीय महिमाने २००६ साली आर्किटेक्ट बॉबी मुखर्जी याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांनंतरच महिमाने ती गरोदर असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ती लग्नापूर्वीच गरोदर असल्याच्या बऱ्याचशा चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. महिमा आणि बॉबची आर्यना ही मुलगी आहे. मात्र, आता हे दाम्पत्य विभक्त झाले आहे.

वाचा : या अभिनेत्याच्या वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेली पत्नी-मुलीची हत्या

टेनिस प्लेयर लिएंडर पेस याच्यासोबत महिमाचे प्रेमसंबंध असल्याचीही चर्चा होती. जवळपास सात वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत होते. लिएंडरच्या प्रेमासाठी महिमाने तिचे करियर पणाला लावल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. २०१६ साली आलेल्या ‘डॉर्क चॉकलेट’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमादरम्यान महिमाने स्वतः लिएंडर आणि तिच्या प्रेमसंबंधांबद्दल सांगितले होते. ती म्हणालेली की, कदाचित लिएण्डर हा उत्तम टेनिसपटू असेल, पण त्याने माझ्यासोबत योग्य केले नाही. तो दुस-या कोणत्यातरी व्यक्तीसोबत फिरतोय हे मला ज्याक्षणी कळले तेव्हा मला अजिबात धक्का बसला नाही. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यावर कोणताच परिणाम झाला नाही. उलट, एक व्यक्ति म्हणून मी अधिक विकसित झाले. मला वाटतं त्याने रिह्या (पिल्ले) सोबतही असेच केले असणार. लिएण्डरने रिह्या पिल्लेसाठी महिमाला फसवल्याचे म्हटले जाते.

mahima-chaudhary-2

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Then and now pardes fame mahima chaudhary now looks unrecognisable

ताज्या बातम्या