scorecardresearch

“मला गरज नाही…”, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या प्रश्नावर महेश बाबूने दिले उत्तर

महेश बाबूही बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरु होती.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते. महेश बाबूने अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला हा अभिनेता नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच महेश बाबूने यावर मौन सोडत मनमोकळेपणाने उत्तर दिले आहे.

अभिनेता महेश बाबूचे जगभरात लाखो चाहते आहेत. महेश बाबूचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो. गेल्या काही महिन्यांपासून महेश बाबू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे चर्चा रंगल्या आहेत. त्यासोबतच अनेक ठिकाणी तो लवकर हॉलिवूड चित्रपटात झळकणार असल्याच्या बातम्याही व्हायरल होत आहे. मात्र नुकतंच महेश बाबूने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

“लग्न करुन संकटाचा सामना…”; रितेशने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, जिनिलियाची ‘ती’ कमेंट चर्चेत

मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान महेश बाबूला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “मला हिंदी चित्रपटात काम करण्याची गरज नाही, मी फक्त तेलुगू चित्रपटातच काम करू शकतो. यासोबत तुम्ही लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चाही समोर येत आहे, असा प्रश्न महेश बाबूला विचारण्यात येत होता.

त्यावर तो म्हणाला, मला अद्याप कोणत्याही हॉलिवूड चित्रपटाची ऑफर आलेली नाही. त्यामुळे मला या प्रोजेक्टबद्दल कोणतीही माहिती नाही. दरम्यान त्याच्या या विधानानंतर अनेक अफवांना पूर्णविराम मिळाला. दरम्यान प्रभास, धनुष आणि विजय देवरकोंडा हे दाक्षिणात्य सुपरस्टार सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. त्यामुळे महेश बाबूही बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्याने स्वत: यावर स्पष्टीकरण दिले आहे.

हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानच्या गोव्यातील हॉटेलचा INSIDE व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान सध्या तेलुगू चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत. या यादीमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा आरआरआर चित्रपटाचाही समावेश आहे. त्यासोबतच अल्लू अर्जुन – रश्मिका मंदान्ना यांचा पुष्पा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: There is no need to do hindi movies said mahesh babu on bollywood debut nrp

ताज्या बातम्या