जॅकलिन फर्नांडिसचं नाव लँड्रिंग प्रकरणात चांगलेच चर्चेत आहे. ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी तिचे नाव जोडलं गेल्याने जॅकलिन फर्नांडिस आयकर विभागाच्या रडारवर होती. बुधवारी तिच्यावर ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी तिला आरोपी ठरवण्यात आलंय. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखरनं ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. जॅकलिन फर्नांडिस सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे, अशावेळी तिने देवाचा धावा केला आहे. पिंकव्हीलाला मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिनने अलिकडेच दिल्लीतील छत्तरपूर येथील गुरुजींच्या आश्रमाची भेट घेतली. तिच्या जवळच्या व्यक्तीने असे सांगितले की, जॅकलिनने जुलैमध्ये आश्रमाला भेट दिली. गुरुजींनी स्थापन केलेल्या शिवमंदिरात जाऊन तिने आशीर्वाद घेतला. छत्तरपूर येथील गुरुजींच्या आश्रमात जाण्याचा सल्ला जॅकलीनच्या जवळच्या व्यक्तीने तिला दिला आहे. आश्रमात जाऊन आल्यापासून गुरुजींनी दिलेले ब्रेसलेट परिधान करत आहे आणि दिवसातून एकदा गुरु मंत्राचा जप करत आहे.बॉलिवूडमधील अनेक कुटुंबे दिल्लीतील गुरुजी निर्मल सिंग यांच्यावर दृढ विश्वास ठेवतात. जॅकलिनवरची कारवाई सुरु राहणार मात्र ती 'वूमन स्टोरीज' या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा विनोदी चित्रपट 'सर्कस' देखील या वर्षाच्या शेवटी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जॅकलिन फर्नाडिस अडचणीत; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोपी करण्याचा ‘ईडी’चा निर्णय जॅकलिन मूळची श्रीलंकेची आहे. अभिनेत्री होण्याआधी तिने मॉडेलिंगमध्ये देखील करियर केले आहे. 'अलाउद्दीन' या चित्रपटातून तिने पदार्पण केले. अभिनेता रितेश देशमुखसोबत तिने या चित्रपटात काम केले होते.