बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. शनिवार २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने केलेल्या छापेमारीदरम्यान एनसीबीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी आर्यनसह ७ जणांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या ८ ऑक्टोबरपासून आर्यन हा आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनला कोणतीही खास सुविधा देण्यात आलेली नाही, ज्यामुळे तो इतर कैद्यांपासून वेगळे करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या नियमांनुसार ५ दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर आर्यनला ५ कैद्यांसह सामान्य बॅरकमध्ये हलव्यात आले आहे. माहितीनुसार, आर्यनने आई आणि वडिलांना व्हिडीओ कॉल केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, करोना दरम्यान कारागृहातील कैदी आठवड्यातून दोनदा व्हिडिओ कॉलवर आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलू शकतात.

अधिकांऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने आई आणि वडिलांना व्हिडीओ कॉल केला होता. जवळपास १० मिनिटे त्यांच्यामध्ये संवाद झाला. जो पर्यंत ते बोलत होते तो पर्यंत कारागृहातील अधिकारी अधिकारी तिथे उपस्थित होते.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!

आर्थर रोड कारागृहात यावेळी ३ हजार २०० कैदी आहेत. तर करोना काळात कुटुंबातील सदस्यांना कैदींना भेटण्याची परवानगी नाही. ते त्यांच्याशी यपक्त फोनवर बोलू शकतात. या कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी फक्त १० मिनिटे बोलण्याची परवानगी आहे. म्हणूनच, व्हिडीओ कॉलवर बोलण ही सुविधा आर्यनला त्याच्या वडिलांच्या स्टारडममुळे देण्यात आली नाही तर तो नियम होता. कारागृहात फक्त ११ फोन असल्याचे सांगण्यात येते. त्यासोबत ज्या कैदीच्या घरी व्हिडीओ कॉलवर बोलण्याची सोय आहे. ते कैदी १० मिनिट कुटुंबातील सदस्यांशी बोलू शकतात.

आणखी वाचा : Bigg Boss 15 : ईशान सहगल आणि मायशा अय्यरच्या रिलेशनशिपवर सलमानने केला प्रश्न?

तर मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खानला जेलमध्ये ११ ऑक्टोबरला साडे चार हजार रुपयांचं मनी ऑर्डर आलं आहे. आर्यनला हे पैसे त्याचे वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने पाठवले आहेत. मनी ऑर्डरने आलेल्या या पैशांचा वापर आर्यनने कॅन्टीनमधील जेवणासाठी केला आहे. तुरुंगातील नियमांनुसार कैदींना पैसे हे फक्त मनी ऑर्डरने पाठवले जाऊ शकतात आणि ४ हजार ५०० रुपये ही त्याची जास्तीत जास्त रक्कम आहे आणि ही रक्कम महिन्यातून एकदाच पाठवू शकतो. त्यामुळे कोणत्याही कैदीचे घरचे याहून जास्त पैसे मनी ऑर्डरने पाठवू शकत नाही. आर्थर रोडमध्ये जेल अधिकारी सर्व कैदींना सकाळी ६ वाजता उठवतात. त्यामुळे आर्यन खानलाही जेलमध्ये सकाळी ६ वाजता उठावे लागणार आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत त्याला नाश्ता दिला जाईल. त्यासोबतच अंधार होताच आपल्या बॅरेकमध्ये आर्यनला इतर कैद्यांप्रमाणे जावे लागणार.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These restrictions on shah rukh khan son aryan khan inside mumbai arthur road jail dcp
First published on: 17-10-2021 at 11:53 IST