‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घरा घरात पोहोचलेल्या पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेमुळे अक्षया लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आता अक्षया सोबत पुण्यात एक घटना घडली आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेली असता तिच्या दुचाकीच्या डिकीतील पर्स चोरट्यांनी लंपास केली. त्या पर्समध्ये ५ ते ६ हजार रुपये होते.
या घटनेनंतर अक्षयाने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधला आणि घटलेली घटना सांगितला. ‘मी आणि माझी मैत्रिण २३ फेब्रुवारीला (काल) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माझी पर्स मी मैत्रिणीच्या गाडीच्या डिकीतील बॅगमध्ये ठेवली होती. तेथून आम्ही दोघी नाष्टा करण्यासाठी गेलो. काही वेळाने पुन्हा गाडीजवळ आल्यावर डिकी उघडून पाहिल्यावर आतील साहित्य इकडे तिकडे झाल्याचे दिसून आले’ असे अक्षया म्हणाली.
Lock Upp: अभिनेत्री पूनम पांडे घेणार कंगना रणौतशी पंगा, पॉर्न केसमध्ये आले होते नाव
पुढे ती म्हणाली, ‘त्या बॅगमध्ये पर्स काही दिसून आली नाही. सोबत असलेल्या मैत्रिणीला मी पर्स कुठे गेली असे विचारले. त्यावर तिने घरी राहिली असेल असे उत्तर दिले. नंतर मी घरी येऊन पाहिले तर घरी देखील पर्स नव्हती. पर्स कोणी तरी चोरली आहे हे लक्षात येताच मी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली.’
‘दरम्यान दोन मुलांनी एक पर्स पोलिसांकडे आणून दिली. त्या दोघांकडे चौकशी केली असता आमच्या गाडीच्या तिथे पर्स मिळाली असल्याचे सांगितले. त्या पर्समधील कागदपत्र मिळाली. पण त्यातील जवळपास ५ ते ६ हजार रुपये काढून घेण्यात आले. पैसे गेले पण माझी महत्त्वाची कागदपत्र मिळाली आहे. या तपास कामात डेक्कन पोलिसांनी खूप मदत केली आहे त्या सर्वांचे मी आभार मानते’, असे अक्षया पुढे म्हणाली.