अभिनयाच्या वेडापायी सरकारी नोकरीवर सोडलं पाणी!

मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरेच नाटक सादर केले.

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेल्या ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेत दिघा आणि डॉ. अरविंद अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मूळचा नागपूरचा. वडील शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. संचितने सायकॉलॉजीमध्ये एम. ए. केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली. संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा. दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्याने नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला.

मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरेच नाटक सादर केले. कार्यशाळासुद्धा तो घेत होता. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं. नोकरी करता करता हे सर्व चालू होतं. अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता. खिसे भरत होते मात्र मन भरत नव्हतं. त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्याने पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनी तीन वर्षांची मुदत दिली. या तीन वर्षात अभिनयात तू स्वत:ला सिद्ध केलंस तरच आम्ही तुला पाठिंबा देऊ अशी अट त्यांनी घातली. संचितच्या नशिबाने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या संधीमुळे संचित आणि त्याचे कुटुंबियही खूश झाले. त्यामुळे आता संचितच्या या निर्णयावर त्याचे घरचेही खूष आहेत. संचितचा हा प्रवास खरोखर स्वप्नवत आहे. आवड आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते असं संचितला वाटतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This actor left government job for acting ssv

ताज्या बातम्या