आपल्या सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आज १३ डिसेंबर रोजी स्मिता पाटील यांची पुण्यतिथी आहे. त्या आज आपल्यामध्ये जरी नसल्या तरी त्यांच्या अभिनयाच्या चर्चा कायम असल्याच्या पाहाला मिळतात. स्मिता यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५६ रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजीराव पाटील आणि आई विद्या ताई पाटील.

स्मिता या त्यांच्या गंभीर भूमिकांसाठी विशेष ओळखल्या जायच्या. पण वास्तविक आयुष्यात त्या मुळीच अशा नव्हत्या. आयुष्य जगण्याचा त्यांचा दृष्टीकोन हलकाफुलका होता. त्यांचे शिक्षण एका मराठी शाळेत झाले. एकदा स्मिता यांची ओळख चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्याशी झाली. श्याम बेनेगल यांनी त्यांचा चित्रपट ‘चरणदास चोर’मध्ये त्यांना छोटी भूमिका दिली. त्यानंतर स्मिता यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या.

आणखी वाचा : इंटीमेट सीन करताना कशी होते अवस्था, अभिनेत्यानंच केला खुलासा

स्मिता यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण ‘आज की आवाज’ चित्रपटातील त्यांची आणि अभिनेता राज बब्बर यांच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली. त्यानंतर स्मिता आणि राज बब्बर यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होता. त्यावेळी राज बब्बर विवाहीत असून त्यांना दोन मुले होती. म्हणून स्मिता यांच्या आईने त्यांच्या आणि राज यांच्या नात्याला नकार दिला होता. मात्र स्मिता यांनी कोणाचाही विचार न करता राज यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. ८०च्या दशकात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणे ही खूप मोठी गोष्ट होती.