Video : छोट्या रणबीर-करिनाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘सो क्यूट’

३-४ वर्षांचा रणबीर आपल्या मोठ्या बहिणीला करिनाला त्याच्या भाषेत काहीतरी सांगताना दिसतो.

करिना कपूर खान, रणबीर कपूर

सध्याच्या घडीला कलाकारांपेक्षा त्यांची मुलंच माध्यमांचे अधिकाधिक लक्ष वेधत आहेत. अब्राम खान, आराध्या बच्चन, आझाद राव खान, मिशा कपूर यांच्यामधील एक प्रसिद्ध ‘स्टार किड’ म्हणजे तैमुर अली खान. सैफचा छोटा मुलगा असलेला तैमुर माध्यमांचे नेहमीच लक्ष वेधतो. पण, यावेळी तैमुरने नव्हे तर त्याच्या आईने म्हणजेच करिना कपूर खान आणि मामा रणबीर कपूर यांनी सर्वांचे लक्ष वेधलेय.

वाचा : प्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्यापासून सलमान-ऐश्वर्यापर्यंत..

करिना आणि रणबीर हे कपूर खानदानातील दोन अनमोल कलाकार आहेत. अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या या दोन्ही कलाकारांचा बालपणीचा एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत ३-४ वर्षांचा रणबीर आपल्या मोठ्या बहिणीला करिनाला त्याच्या भाषेत काहीतरी सांगताना दिसतो. पण, त्याच्या बोबड्या शब्दांमुळे तो नक्की काय बोलतोय याचा पत्ताच लागत नाही. आपल्या भावाच्या बोलण्यानंतर छोट्या करिनाच्या चेहऱ्यावर दिसणारे भावही अगदी गोड आहेत.

वाचा : आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज

सध्या #ThrowbackThursdays आणि #FlashbackFridays या संकल्पना बऱ्याच प्रचलित झाल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आपले जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यानिमित्ताने आपल्यालाही त्यांच्या जुन्या आठवणींची सफर घडते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनम कपूरने बहीण रीया आणि भाऊ हर्षवर्धन यांच्यासोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This childhood video of kareena kapoor khan and ranbir kapoor is pure gold