scorecardresearch

Premium

वहिदा रेहमान यांची पहिली प्रतिक्रिया, “दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर..”

वहिदा रेहमान यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

What Wahida Rehman Said?
वहिदा रेहमान यांनी नेमकं काय म्हणाल्या?

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आजच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी एक्सवर (ट्विटर)पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यानंतर वहिदा रेहमान यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाल्या वहिदा रेहमान?

“मी आज खूप आनंदी आहे. मला दुप्पट आनंद झाला आहे. कारण देव आनंद यांचा वाढदिवस आहे. मला वाटतं आता त्यांना जी भेटवस्तू मिळणार होती, पण ती मला मिळाली. मी खूप खुश आहे. सरकारचा एक मोठा पुरस्कार आहे. त्यासाठी मी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानते आहे.” असं ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत वहिदा रेहमान यांनी म्हटलं आहे.

gayatri-joshi
कार अपघात प्रकरणी गायत्री जोशीचे पती विकाश ओबेरॉय यांची चौकशी सुरू; दोषी आढळल्यास होऊ शकते ७ वर्षांची शिक्षा
sky-force-akshay-kumar
Sky Force Promo: गांधी-शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अक्षय कुमारची मोठी घोषणा; भारताच्या पहिल्या हवाई हल्ल्यामागील गोष्ट उलगडणार
Lal Bahadur Shastri Jayanti 2023
Lal Bahadur Shastri Jayanti : लालबहादूर शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार नक्की वाचा आणि करा तुमच्या प्रियजनांना शेअर
suraj pancholi
सूरज पांचोली लवकरच अडकणार विवाहबंधनात? मिस्ट्री गर्लबाबत खुलासा करत म्हणाला…

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. वहिदा रेहमान या जुन्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी देवआनंद, गुरुदत्त यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांसह काम केलं आहे. तसंच दुसऱ्या इनिंगमध्ये चरित्र भूमिकाही मोठ्या ताकदीने साकारल्या आहेत. ‘रंग दे बसंती’ सिनेमातल्या मिसेस राठोड असोत किंवा ‘ओम जय जगदीश’ सिनेमातल्या सरस्वतीदेवी बत्रा सगळ्याच भूमिका त्यांनी खूप ताकदीने साकारल्या आहेत. विविधरंगी अभिनयाचे रंग आपल्या प्रत्येक कलाकृतीत भरणाऱ्या वहिदा रेहमान यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This is a gift i got waheeda rehman on being conferred dadasaheb phalke award scj

First published on: 26-09-2023 at 19:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×