‘बिग बॉस’च्‍या घरात का होतेय किंग खानची चर्चा?

टास्क पूर्ण झाल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धक निवांतपणे एकमेकांशी गप्पा मारण्यात रंगून जातात.

टास्क पूर्ण झाल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धक निवांतपणे एकमेकांशी गप्पा मारण्यात रंगून जातात. या गप्पांमध्ये कधी कोणता विषय निघेल हे सांगता येत नाही. एखादा विषय निघालाच तर त्यावर मग प्रत्येकजण आपापल्या आठवणी सांगण्यात मग्न होऊन जातो. यावेळी गप्पांमध्ये मात्र बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा विषय निघाला. वूटच्या अनसीन अनदेखाच्या नवीन क्लिपमध्ये घरातील स्पर्धक किंग खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याविषयी बोलताना दिसून आले.

”मन्‍नतमध्ये आधी बरेच शूटिंग्‍ज व्‍हायचे. एकदा आमचंही शूटिंग झालेलं होतं तिथे,” असं किशोरी शहाणे सांगतात. यावर अभिजीत बिचुकले होकार देत म्‍हणतो, ”तेजाबची शूटिंगसुद्धा तिथेच झाली आणि कदाचित अग्निपथची सुद्धा शूटिंग तिथेच झाली असावी. तो बंगला घेणं सोपी गोष्‍ट नव्‍हती, स्‍वप्‍नाळू आहे शाहरुख!”

Video : ‘तेरी बन जाऊंगी’ अल्बममध्ये अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज

किशोरी शहाणे आपला अनुभव सांगतात, ”त्‍या काळात जेव्‍हा शाहरुख स्‍टार झाला तेव्हा त्याने तो बंगला विकत घेतला होता. जवळपास २० वर्षांपूर्वीची गोष्‍ट आहे.” ने‍हा, शिव, बिचुकले आणि किशोरी यांच्‍यात शाहरुख खानच्‍या स्‍टारडमबाबतच्‍या गप्‍पा चांगल्‍याच रंगल्‍या. पुढे किेशोरीताई बॉलिवूडच्‍या तिन्‍ही खानचा जन्‍म एकाच वर्षी झाल्याचे सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This is why bigg boss marathi contestants were talking about shah rukh khan ssv

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या