मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर मागील १० वर्षांपासून गायब आहे ही अभिनेत्री

१९९९ मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता

मिस वर्ल्डसारखा मोठा किताब जिंकणाऱ्या अनेक मॉडेल्सची पाऊले अभिनयाच्या दिशेने वळताना पहायला मिळतात. त्या भविष्यात पुढे अभिनेत्री म्हणून नावारुपास येतात. याचे चांगले उदाहरण म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि प्रियांका चोप्रा. या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव होते. मात्र ही अभिनेत्री गेल्या १० वर्षांपासून बॉलिवूडच्या झगमटापासून लांब आहे. तुम्ही युक्ता मुक्ती हे नाव ऐकले आहे का? मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये एण्ट्री मारली होती. पण गेल्या १० वर्षांपासून ही अभिनेत्री सर्वांपासून दूर आहे. आज युक्ताचा वाढदिवस आहे. मात्र सध्या युक्ता काय करते हे कोणालाच ठाऊक नाही.

युक्ताचा जन्म १९७९ साली बेंगळुरुमधील एका सिंधी कुटुंबामध्ये झाला. त्यानंतर १९८६ पर्यंत युक्ता दुबईमध्ये राहिली. काही दिवसात तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि ती भारतात आली. त्यानंतर १९९९ मध्ये युक्ताने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. हा किताब जिंकल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्यासा’ या चित्रपटातून युक्ताने अभिनयाच्या दुनियेला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कटपुतली’ आणि ‘लव इन जपान’ या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर तिने एका भोजपूरी चित्रपटात काम केले. परंतु तिला तिकडेही यश मिळाले नाही. २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेमसाब’ हा तिचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यानंतर युक्ता आजपर्यंत कोणत्या चित्रपटात झळकली नाही.

युक्ताने २००८ मध्ये न्यूयॉर्कचा प्रसिद्ध उद्योगपती प्रिंस तुलीशी लग्न केले. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. अखेर २०१४ मध्ये तिने घटस्फोट घेतला. सध्या युक्ता काय करते? कुठे राहते हे कोणालाच माहिती नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This miss world actress stay away from golden screen avb

ताज्या बातम्या