‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दया बेनच्या जोडीने तर लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे. या शोमधील दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीने शोमधून ब्रेक घेतला आहे. मात्र तरीही ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच दिशाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती बोल्ड डान्स करताना दिसत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमात आपण दिशाला अनेकदा गरबा करताना पाहिले आहे. पण नुकतंच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ती बोल्ड डान्स करताना दिसत आहे. यात तिने बोल्ड कपडेही परिधान केले आहे. ‘भिंगरी ग भिंगरी…’ या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. तिची डान्स आणि स्टाइल पाहून नेटकरी आवाक झाले आहेत.

A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

अभिनेते किरण मानेंनी शेअर केला नागराज मंजुळेंसोबतचा खास फोटो, म्हणाले…

या व्हिडीओत दिशाने निळ्या रंगाचा मिनी स्कर्ट आणि बॅकलेस टॉप परिधान केला आहे. या व्हिडीओत ती फार बोल्ड अंदाजात दिसत आहे. दिशाचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ फार जुना आहे. या व्हिडीओत दिशाही ग्रुप डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण थक्क झाले आहेत.

CID मधील दयासोबत विशाखा सुभेदार शेअर करणार स्क्रीन, फोटो पोस्ट करत म्हणाली…

दिशा वकानीच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी ‘हे माँ माताजी!’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘टप्पू की मम्मी बिघड गई’, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एकाने ‘जेठालालला सांगू का?’ असेही काहींनी म्हटले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिशाचा कोळी डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ‘दर्या किनारे एक बंगलो…’ या कोळी गीताच्या अल्बमचा आहे. यात दिशाचा काहीसा बोल्ड लूक दिसून येतोय. दिशाने गोल्डन रंगाचा स्कर्ट आणि बॅकलेस ब्लॉऊज परिधान केल्याचं पाहायला मिळतंय.