शाहरुख, सैफ, अक्षयचा हा फोटो व्हायरल

बी टाऊनचा खिलाडी, किंग खान आणि नवाब एकाच फोटोत कैद

akshay kumar, srk, saif ali khan
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकारांनी कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:ची ओळख बनवली आहे. अशाच काही कलाकारांमधील काही  नावं म्हणजे शाहरुख खान आणि अक्षय कुमार. विविध चित्रपटांद्वारे या कलाकारांनी आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बी टाऊनमधील या कलाकारांचा नवाब सैफ सोबतचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये या तिन्ही कलाकारांना पाहता भूतकाळातील काही दिवस आणि या कलाकारांचे चित्रपट आठवल्यावाचून राहणार नाही. चित्रपटांच्या वाट्याला आलेल्या यशाने २०१७ या वर्षाची सुरुवात करणाऱ्या अभिनेता अक्षय कुमार आणि किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तर, सैफ त्याच्या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान, ‘अॅडिक्टेड टू एसआरके’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार दिसत असून फोटो पाहताना पुन्हा एकदा अनेकांच्या मनात नव्वदच्या दशकातील आठवणी जाग्या होतील असाच काहीसा हा फोटो आहे. शाहरुख आणि अक्षयने फार कमी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या तुलनेत खिलाडी कुमार आणि नवाब सैफने ‘किमत’, ‘मै खिलाडी तू अनाडी’, ‘ये दिल्लगी’, ‘टशन’, ‘आरजू’, ‘तू चोर मै सिपाही’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

https://www.instagram.com/p/BQrrGTND20H/

या तिन्ही कलारकारांचा हा फोटो व्हायरल होण्यामागे कोणतेही कारण नसले तरीही चित्रपट प्रेमींसाठी आणि या तिन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी हा जुना फोटो एक पर्वणी ठरत आहे असेच म्हणावे लागेल. कलाकार आणि चित्रपटसृष्टीशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या काही आठवणी यांबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच कुतूहलाचे वातावरण पाहायला मिळते. चाहत्यांमध्ये असणारे हेच कुतूहल आणि उत्सुकता पाहता सध्या सोशल मीडियाद्वारे विविध फॅन पेजेस आणि खुद्द बॉलिवूड कलाकारही त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन विविध व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करतच असतात. त्यामुळे कलाकार आणि चाहत्यांना जोडणारा एक दुवा म्हणूनही सोशल मीडियाकडे पाहिले जात आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Throwback picture of akshay kumar shah rukh khan and saif ali khan going viral