नव्या वर्षांत तिकीटबारीवरची गणितं चांगली जुळली आहेत. या महिन्याभरात २५ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या अलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटापासून बॉलीवूडची गाडीही वेगाने धावू लागली आहे. गेल्या महिन्याभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या तिकीटबारीवरील व्यवसायाचे गणित  हे वेगळय़ाच कारणाने चर्चेत आले. नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ किती कमाई करतो आहे आणि त्यानंतर प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट किती कमाई करतो आहे, याची तुलना सुरू झाली होती. एका क्षणी ‘द काश्मीर फाइल्स’ची झालेली विक्रमी कमाई आणि गेल्या आठवडय़ात ‘आरआरआर’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्या झाल्या पहिल्याच दिवशी जगभरात दोनशे कोटींहून अधिक कमाई केल्याने आता वादविवाद, तुलना मागे पडली आहे. कोणता चित्रपट सर्वाधिक कमाई करत नवनवे मापदंड निर्माण करतो याकडे आता सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

प्रादेशिक चित्रपटांना, विशेषत: दाक्षिणत्य भाषेतील चित्रपट आणि मराठी चित्रपटांना या वर्षी उदंड यश मिळाले. कधी नव्हे ते हॉलीवूडपटांच्या बरोबरीने या चित्रपटांची दखल हिंदी चित्रपटांनाही घ्यावी लागली आहे. त्यामुळे प्रादेशिक चित्रपटांचे यश लक्षात घेत आता कुठल्या हिंदी चित्रपटांना यश मिळते आहे, याकडेही इंडस्ट्रीचे बारीक लक्ष आहे. मार्च महिन्यात नागराज मंजुळे दिग्दर्शित बहुचर्चित ‘झुंड’, ‘द काश्मीर फाइल्स’, प्रभासची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित ‘राधेश्याम’, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आणि आता ‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ असे पाच हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यापैकी सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘आरआरआर’ हे दोन चित्रपट वगळता बाकीचे तिन्ही चित्रपट तिकीटबारीवर अपयशी ठरले आहेत. अर्थात इतर दोन चित्रपटांनी ज्या पद्धतीची विक्रमी कमाई केली आहे ते पाहता इतरांचे अपयश हे फारसे झोंबणारे नाही.

mrunal dusanis daughter name is nurvi
मृणाल दुसानिसच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? नाव ठेवलंय खूपच खास, पहिल्यांदाच सांगितला अर्थ
marathi actor Suyash Tilak new serial aadishakti coming soon
Video: ‘अबोली’मधील दमदार भूमिकेनंतर सुयश टिळक येतोय नव्या रुपात नव्या मालिकेत, सोबतीला असणार ‘देवयानी’मधील ‘हा’ अभिनेता
Kashmera Shah on govinda attending Krushna Abhishek sister Arti Singh marriage
भाची आरती सिंहच्या लग्नात गोविंदा सहभागी होणार का? कश्मीरा शाह म्हणाली, “…मी त्यांच्या पाया पडेन”
Marathi Actress Prajakta Mali glamorous photoshoot viral
“नुसता जाळ अन् धूर…”, प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले, “हाय गर्मी”

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट मार्चच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्यापासूनच संमिश्र प्रतिसाद मिळाला. हळूहळू चित्रपटाची कमाई वाढत जाईल, हा या चित्रपटाबाबतीतला अंदाज खोटा ठरला. त्याआधीच्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि मराठीतील दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनिखड’ या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद कायम राहिला. त्याचा काहीसा परिणाम ‘झुंड’च्या व्यवसायावरही झाला. त्याच्याच पुढच्या आठवडय़ात ‘राधेश्याम’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ हे दोन चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले. पहिल्या दिवशी अगदी एखाददुसरा खेळ या वेगाने सुरू झालेला ‘द काश्मीर फाइल्स’दुसऱ्याच दिवशी इतका लोकप्रिय झाला, की इतर सगळे खेळ रद्द होऊन या चित्रपटाचे दिवसभरात चार ते पाच खेळ सुरू झाले. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर भाष्य करणारा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’ आणि ‘बजरंगी भाईजान’सारख्या चित्रपटांचे विक्रम मोडले असल्याचे सांगितले जाते. आत्तापर्यंत कमी बजेटमध्ये निर्मिती झालेल्या या चित्रपटाने २११.८३ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने त्याच्या आसपास प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटांचेही कंबरडे मोडून टाकले आहे. या चित्रपटाच्या यशाचा सर्वाधिक फटका हा ‘राधेश्याम’ आणि अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ला बसला.

माझा चित्रपटही बुडाला..

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळालेले अनपेक्षित यश हे सगळय़ांचीच गणितं चुकवणारे ठरले. प्रभासच्या ‘राधेश्याम’ या चित्रपटाला दुसरा आठवडा उलटता उलटता २११ कोटी रुपये कमाई करणे शक्य झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्चच ३०० कोटींचा असल्याने चित्रपट तिकीटबारीवर संपूर्ण ढेपाळला आहे. असाच मोठा फटका बसला आहे तो ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाला.. एरव्ही अक्षय कुमारचे चित्रपट हे शंभर कोटींच्या आसपास सहज पोहोचतात, मात्र ‘द काश्मीर फाइल्स’च्या यशाने धुऊन निघालेल्या या चित्रपटाला अजून ५० कोटींचा पल्लाही गाठता आलेला नाही. आपल्या अपयशाची खुद्द अक्षयनेही मिश्कील कबुली दिली आहे. एका जाहीर प्रसिद्धी कार्यक्रमात बोलताना अक्षय कुमारने विवेक अग्निहोत्रींनी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या देशासमोर एक विदारक सत्य ठेवलं आहे, अशा शब्दांत त्यांचं कौतुक केलं. त्यांचा चित्रपट एक अनोखी भेट ठरला आहे. आता या भेटीने माझा चित्रपटही बुडवला ही वेगळी गोष्ट आहे, असं सांगत खिलाडूपणे त्याने आपली हार कबूल केली आहे.

राजमौलींचं तंत्र पुन्हा यशस्वी

गेल्या दोन आठवडय़ांतील हा चित्रपट योग्य की तो योग्य? हे सगळे वाद मागे टाकून महिनाअखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ने राजामौलींच्या चित्रपटाची करामत पुन्हा प्रेक्षकांसमोर आणली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘बाहुबली’नंतर राजामौलींचा पुढचा चित्रपट कसा असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. त्या पार्श्वभूमीवर रामचरण आणि ज्युनियर एनटीआर या दोघांना एकत्र आणत राजामौलींनी ‘आरआरआर’ ही १९२० च्या काळातील कथा पडद्यावर जिवंत केली आहे. या दोन कलाकारांबरोबरच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्या झाल्या पहिल्याच दिवशी जगभरातून २५७ कोटींची कमाई करत नवा विक्रम केला आहे. राजामौलींची जादू पुन्हा कमाल करून गेली आहे. अर्थात याही चित्रपटाचा निर्मिती खर्च ३०० कोटींचा असल्याने यशाचे गणित साधण्यासाठी अजून घोडदौड करावी लागणार आहे; पण पहिल्याच दिवशीचा ट्रेण्ड पाहता हा चित्रपट पहिल्या आठवडय़ात खर्चाचे गणित पार करून यशस्वी वाटचाल करेल, असा अंदाज ट्रेड विश्लेषकांनी वर्तवला आहे. याही चित्रपटाने सर्वाधिक गल्ला हा दक्षिणेतून आणि परदेशातून कमावला असला तरी बहुभाषिक चित्रपट असल्याचा फायदा मिळाला आहे.