सलमान खान आणि कतरिना कैफ या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळते. आता सलमान-कतरिनाच्या ‘टायगर ३’ चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. अखेरीस या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये कतरिनाचा लूक पाहून सारेच जण थक्क झाले आहेत.

आणखी वाचा – VIDEO : जस्टिन बीबरच्या चेहऱ्याची विचित्र अवस्था, गंभीर आजाराचा करतोय सामना, शो देखील केले रद्द

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
bade miyan chote miyan release date
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
nach ga ghuma teaser launch mukta barve and namrata sambherao
नम्रता संभेराव अन् मुक्ता बर्वेची अनोखी जुगलबंदी! ‘नाच गं घुमा’चा टीझर प्रदर्शित, छोट्या मायराने वेधलं लक्ष

यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये कतरिना बरेच अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. चेहऱ्यावर प्रचंड राग, घामाने भिजलेलं अंग, मोकळे केस असा कतरिनाचा लूक आहे. तसेच समोरच्या व्यक्तीवर वेगाने वार करताना ती दिसत आहे.

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करताना ‘टायगर ३’च्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२३ला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच काही तासांमध्येच १० हजारपेक्षा अधिक लोकांनी याला पसंती दिली आहे. तसेच कतरिनाच्या नव्या लूकचं तिच्या चाहत्यांनी कौतुक देखील केलं आहे.

आणखी वाचा – VIDEO : ए आर रहमान यांच्या लेकीचा ग्रँड रिसेप्शन सोहळा, बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींची हजेरी

‘टायगर ३’ हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सलमान-कतरिनाबरोबरच इमरान हाशमी देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. धमाकेदार अॅक्शन सीन्ससह ‘टायगर ३’मध्ये सलमान-कतरिनाचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळणार आहे.