हॉलिवूडच्या स्पायडर-मॅनसाठी टायगर श्रॉफने दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “माझं काम पाहून ते…” | Loksatta

हॉलिवूडच्या स्पायडर-मॅनसाठी टायगर श्रॉफने दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “माझं काम पाहून ते…”

अॅक्शन हिरो प्रकारात माझ्या वयातला कोणताही अभिनेता आहे, असं आपल्याला वाटत नसल्याचं टायगरचं म्हणणं आहे.

हॉलिवूडच्या स्पायडर-मॅनसाठी टायगर श्रॉफने दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “माझं काम पाहून ते…”
(फाईल फोटो)

अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अॅक्शन आणि स्टंट्ससाठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटातील अॅक्शनचे प्रेक्षक चाहते आहेत. अलिकडेच एका मुलाखतीत फ्लाइंग जट टायगरने हॉलिवूडच्या स्पायडर-मॅनसाठी ऑडिशन दिल्याचा खुलासा केलाय. २००२मध्ये स्पाडयरमॅनची सीरिज सुरू झाल्यापासून आतापर्यंत हॉलिवूड अभिनेते टोबे मॅग्वायर, अँड्र्यू गारफिल्ड आणि टॉम हॉलंड यांनी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

स्वप्नाचा नक्षीदार प्रवास; ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

दरम्यान, मार्व्हल कॉमिक्समध्ये स्पायडर-मॅनचे भारतीय व्हर्जन असतानाही अजून कोणत्याही भारतीय अभिनेत्याने त्याला पडद्यावर साकारलेलं नाही. अशातच आता टायगरने आपण स्पायडरमॅनसाठी ऑडिशन दिल्याचा खुलासा केलाय. ही भूमिका मिळण्याच्या अगदी जवळच्या स्टेजला पोहोचलो होतो, असंही त्याने सांगितलं. “मी त्यांना माझ्या टेप्स, शो-रील्सदेखील पाठवले होते. मी काय करू शकतो, हे पाहून ते खूप प्रभावित झाले होते. मी त्यांना म्हटलं होतं की मी तुमचा VFX वरील खर्च वाचवू शकेन, कारण स्पायडर-मॅन जे काही मी करू शकतो ते मी करू शकतो,” असं कनेक्टएफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत टायगर म्हणाला.

रश्मिकाने विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही एकमेकांच्या…”

टायगरने कोणत्या एडिशनसाठी ऑडिशन दिली, हे मात्र त्याने सांगितलं नाही. तसेच हॉलिवूडबद्दल तो म्हणाला, “मला तिथल्या अनेक प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळाली. मी जे काही करतोय, त्यात त्यांना रस असल्याचंही मला जाणवलं. जॅकी चॅननंतर कोणीही क्रॉसओवर अॅक्शन हिरो झालेला नाही आणि अॅक्शन हिरो प्रकारात माझ्या वयातला कोणताही अभिनेता आहे,” असं मला वाटत नाही.”

दरम्यान, टायगरचा शेवटचा हिरोपंती २ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. ७० कोटीचं बजेट असलेल्या या चित्रपटाने केवळ ३५ कोटी रुपये कमावले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video: पाठकबाईंची हटके बॅचलर पार्टी, लुंगी नेसून धरला प्रसिद्ध गाण्यावर ताल

संबंधित बातम्या

नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर
“नाझी आणि हिटलरबद्दल मला प्रेम वाटतं कारण…” कान्ये वेस्टचे वादग्रस्त वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही
‘जत तालुक्यातील ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना दीड वर्षात पूर्ण करणार’; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन