नेटकऱ्याने विचारले ‘तू व्हर्जिन आहेस का?’ सलमानचे उदाहरण देत टायगर म्हणाला..

अरबाज खानच्या ‘पिंच’ या शोमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर टायगरने उत्तर दिले आहे.

tiger shroff, salman khan,
अरबाज खानच्या 'पिंच' या शोमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर टायगरने उत्तर दिले आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ एक अॅक्शन हीरो म्हणून ओळखला जातो. टायगरचे लाखो चाहते आहेत. टायगर सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आपल्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्यात काय होतं हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याला असते. त्याच प्रमाणे टायगरचे चाहते ही त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याच्या खासगी आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारत असतात, तर काही नेटकरी त्याला ट्रोल करत असतात. एका मुलाखतीत ट्रोलर्सकडून विचारलेल्या प्रश्नावर टायगर उत्तर देत होता. त्यावेळी एक नेटकऱ्याने त्याला व्हर्जिन (Virgin म्हणजेच आयुष्यात एकदाही शरीरसंबंध न ठेवलेला) आहेस का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर टायगरने मजेशीर उत्तर दिलं आहे.

टायगरने नुकतीच अरबाज खानच्या ‘पिंच २’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक कलाकाराला त्याला केलेल्या ट्रोल्सवर उत्तर द्यावे लागते. तर या प्रोमोत अरबाज टायगरला सोशल मीडियावर विचारलेले प्रश्न विचारताना दिसतं आहे. त्यातला एक प्रश्न होता की ‘टायगर व्हर्जिन आहे का?’ यावर टायगर बोलतो, ‘हे बघ, मी सलमान भाईजानसारखा व्हर्जिन आहे.’ टायगरचे हे उत्तर ऐकताच अरबाज हसू लागतो.

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

आणखी वाचा : ‘…या चोरीसाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळालं असतं’; इस्रायलच्या राष्ट्रगीतामुळे अनु मलिक झाले ट्रोल

दरम्यान, टायगरने २०१४ मध्ये ‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने ‘बाघी’ आणि ‘स्टूडंट ऑफ द इयर २’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी टायगरचा ‘बाघी ३’ हा चित्रपट पदर्शित झाला होता. आता लवकरच टायगर ‘हीरोपंती २’ आणि ‘गणपत’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tiger shroff says he is virgin like salman khan on arbaaz khan pinch season 2 dcp