Video : ‘टिक टॉक मधुबाला’चा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

‘टिक टॉक’ या व्हिडीओ अॅपवर कधी कोण रातोरात प्रसिद्ध होईल याचा नेम नाही.

‘टिक टॉक’ या व्हिडीओ अॅपवर कधी कोण रातोरात प्रसिद्ध होईल याचा नेम नाही. या अॅपवर आजवर बरेच बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे दिसणारे सामान्य नेटकरी प्रसिद्ध झाले. यात हुबेहूब दिसणारा सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अजय देवगण, काजोल यांच्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरू झाली. आरसपानी सौंदर्यामुळे प्रसिद्ध झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी एक तरुणी ‘टिक-टॉक’वर सध्या धुमाकूळ घालत आहे. प्रियांका कोंडवाल असं तिचं नाव असून अनेकजण तिचे व्हिडीओ शेअर करत आहेत. इतकंच नाही तर नेटकऱ्यांनी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरकडे प्रियांकाला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याची मागणी केली आहे.

प्रियांकाचा चेहरा बऱ्याच अंशी मधुबाला यांच्याशी मिळताजुळता आहे. अनेकांनी तर ‘टिक-टॉकची मधुबाला’ असं तिचं नामकरण केलं आहे. तुम्हाला ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातील मधुबाला व अशोक कुमार यांचं ‘ये क्या कर डाला तुने’ हे गाणं आठवतंय का? नाही, तर गाण्याचा हा व्हिडीओ पाहा..

प्रियांकाने हेच गाणं ‘टिक-टॉक’वर तिच्या व्हर्जनमध्ये रेकॉर्ड करून पोस्ट केलं आहे. या व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

Video : बिग बींचा फोटो पाहताच रेखा यांची ‘ती’ प्रतिक्रिया आजही खळखळून हसण्यास पाडते भाग

‘टिक-टॉक’वर बॉलिवूड सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्यांनी पोस्ट केलेले व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफसारखी हुबेहूब दिसणारी एक तरुणी चर्चेत आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tiktok madhubala is the latest internet sensation twitter asks karan johar to give her a film ssv

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या