अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल केलं जातं. अनेक सेलिब्रिटी या ट्रोलिंगकडे दूर्लक्ष करतात. तर अनेकजण ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देतात. नुकतच अभिनेत्री तिलोत्तमा शोमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. एका नेटकऱ्याने तिलोत्तमाला ‘फ्लॉप अभिनेत्री’ म्हणत ट्रोल केलंय. तर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला तिलोत्तमाने देखील हटके प्रतिक्रिया दिलीय.

तिलोत्तमाने स्वत: एक ट्वीट केलं आहे. यात ती म्हणाली, “सोशल मीडियावरील एका नेटकऱ्याने मी मोलकरणीसारखी दिसणारी एक फ्लॉप अभिनेत्री असल्याचं म्हंटलं आहे. पण आता माझी परिस्थिती पाहता तो अगदी साधा अपमान कसा आहे?” असं तिलोत्तमा म्हणाली.

हे देखील वाचा: ” ते माझा बलात्कार करतील अशी भीती होती”, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव

तिलोत्तमाने नेटकऱ्याला दिलेल्या या उत्तरावर अभिनेत्री पूजा भट्टने देखील प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ” तू खऱ्या अर्थाने स्टार आहेस… ज्याचा प्रकाश केलेल्या कामातून आणि स्पर्श केलेल्या त्या प्रत्येक गोष्टीतून कायम झळकत राहतो. द्वेष करणारे ‘डार्क मॅटर’ सारखे असतात.” असं म्हणत पूजाने तिलोत्तमाला सपोर्ट केलाय.

हे देखील वाचा: “पांढरे केस का लपवत नाहीस?”; वडिलांच्या प्रश्नावर समीरा रेड्डीने दिलं ‘हे’ उत्तर

तिलोत्तमाचा ‘सर’ हा सिनेमा चांगलाच लोकप्रिय ठरला होता. नुकताच युकेतील एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिलोत्तमाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘रहागीर’ या सिनेमातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळालाय.