करोना व्हायरसने आणखी एका कलाकाराचा बळी घेतला आहे. ब्रिटनचे प्रसिद्ध कॉमेडियन टिम ब्रुक-टेलर यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. त्यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. ब्रुक हे ‘गुडीज’ या तीन लोकप्रिय विनोदी कलाकारांच्या टीमपैकी एक होते. ‘गुडीज’ या टीममध्ये ब्रुक यांच्यासोबतच ग्रीम गार्डन आणि बिल ऑडी होते.

ब्रुक यांनी १९६० मध्ये टीव्ही आणि रेडिओवर कॉमेडीला सुरुवात केली. १९७५ मध्ये ‘फंकी गिबन’ या त्यांच्या गाण्याला फार प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाली. ‘अॅट लास्ट द १९४८ शो’ या टीव्ही शोचे ते महत्त्वपूर्ण सदस्य होते. ब्रुक यांच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

साऱ्या यंत्रणा करोनाशी झुंजत असल्या तरी जगभरात करोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार मागच्या २४ तासात अमेरिकेत करोना व्हायरसमुळे १,५१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.