'टायटॅनिक' या चित्रपटातून जगभरात प्रसिद्ध झालेला अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रिओने सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की लिओनार्डो डि कॅप्रिओने त्याची २५ वर्षीय गर्लफ्रेंड कॅमिला मोरोनसोबत ब्रेकअप केले आहे. आता हॉलिवूड अभिनेता सुपरमॉडेल गीगी हदीदला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. आणखी वाचा : प्रदर्शनाच्या आधीच ‘ब्रम्हास्त्र’ने कमावले ‘इतके’ कोटी, नवा विक्रम रचण्यासाठी चित्रपट सज्ज 'टायटॅनिक' चित्रपटातील जॅकच्या भूमिकेत त्याला चांगलीच पसंती मिळाली होती. तो ४७ वर्षांचा आहे, परंतु तो स्वतःहून २३ वर्षांनी लहान अभिनेत्री कॅमिला मोरोनला डेट करत होता. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा यापूर्वीही रंगल्या होत्या. तो आता प्रसिद्ध मॉडेल गीगी हदीदसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. कॅमिला मोरोनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर लिओनार्डो गीगी हदीदसोबत बराच वेळ घालवत आहे. लिओनार्डो आणि गीगी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक वेळा भेटले होते. ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. गीगी लिओनार्डोला आवडेल अशी आहे. मात्र, अद्याप दोघांनीही त्यांच्या या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. जर त्यांनी त्यांचे नाते अधिकृत केले तर त्यांचे नाव टॉप हॉलीवूड जोडप्यांच्या यादीत सामील होईल. हेही वाचा : दोघांत तिसरा? ‘टायटॅनिक’ फेम अभिनेत्यासोबत गर्लफ्रेंडच्या ‘त्या’ VIRAL VIDEO वर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस म्हणाले… गीगी हदीदने अद्याप लिओनार्डोशी अधिकृतपणे डेटिंग सुरू केलेली नाही. जीजी हदीदचे वयही लिओनार्डोपेक्षा बरेच लहान आहे. ती २७ वर्षांची आहे. तसेच गीगी हदीद एका मुलीची आई देखील आहे. गायक झायन मलिकला याआधी ती डेट करत होती. गीगी आणि लिओनार्डो सध्या कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रीण आहेत. सध्या ही दोघं जवळच्या मित्रांप्रमाणे एकत्र वेळ घालवत असल्याच्याही चर्चा आहेत. कॅमिला मोरोनशी लिओनार्डोचा ब्रेकअप होण्यापूर्वी ४ वर्षे ती दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर आता लिओनार्डो गीगीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.