‘तारक मेहता…’ मध्ये बाघा असं काय वागतोय? चंपकलाल यांना पुरूष मंडळींवर येतेय शंका

गोकुळधाम सोसायटीत सध्या पार्टीचा माहौल सुरूय. पण यात बाघाचं विचित्र वागणं पाहून सगळेच जण आश्चर्य झालेत. पण चंपकलाल मोठ्या हुशारीने याचा छडा लावतात.

tmkoc-latest-episode

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये गोष्ट आनंदाची असो वा मग दुःखाची…गोकुळधाम सोसायटीत धुमाकूळ माजतेच. सध्या गोकुळधाम सोसायटीत पार्टीचा माहौल सुरूये. या पार्टीत बाघा मात्र काही विचित्र वागताना दिसून येतो. बाघाचं हे विचित्र वागणं पाहून गोकुळधाम सोसायटीतील सर्व महिला चिंतेत पडतात. तर दुसरीकडे पुरूष मंडळी मात्र काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात. पण चंपकलाल तर सुरूवातीपासूनच हुशार…त्यामुळे पुरूष मंडळींची चल विचल पाहून त्यांना सुद्धा काही तरी गडबड असल्याची शंका येते.

 

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये नवं संकट

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये गोकुळधामवासियांबरोबर बाघा सुद्धा पार्टी एन्जॉय करत होता आणि आनंदाच्या भरात चुकून तो मिर्ची खातो. त्यामूळे मिर्चीमुळे तोंडाची आग विझवण्यासाठी तो लागोपाठ कोल्ड ड्रिंक पीत असतो. पण तोंडाची आग विझवण्यासाठी जी कोल्ड ड्रिंक तो प्यायला घेत असतो ती काही साधी कोल्ड ड्रिंक नसते. गोकुळधाम सोसायटीतल्या पुरूष मंडळींनी त्यांच्या सिक्रेट पार्टीसाठी स्पेशल ड्रिंकची व्यवस्था केलेली असते. याची कुणाला कल्पना देखील नसते. पण पुरूष मंडळींच्या या प्लॅनमध्ये एक छोटीशी गडबड होते. बाघाने मिर्चीमुळे झालेली तोंडाची आग विझवण्यासाठी कोल्ड ड्रिंक समजून पुरूष मंडळींची ती स्पेशल ड्रिंक पिऊन जातो. त्यानंतर बाघाचं विचित्र वागू लागतो. हे पाहून चंपकलाल यांना पुरूष मंडळींवर शंका येते.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये अशा प्रकारे पुरूष मंडळी एका मोठ्या अडचणीत सापडते. आता यापुढे नक्की काय होणार ? चंपकलाल यांना पुरूष मंडळींच्या या सिक्रेट पार्टीबद्दल कळणार का ? जेठालाल आणि त्याचे मित्र बापूजींना सत्य काय आहे ते सांगणार का? बाघाच्या या विचित्र वागण्यावर पुरूष मंडळी कोणता मार्ग काढणार? अशी एक ना अनेक प्रश्न सध्या फॅन्सच्या मनात घोंगावत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tmkoc latest episode bagha out of control champak lal guessing something wrong prp