बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर ही एलजीबीटी कम्युनिटीसाठी (लेस्बिन, गे, बाय सेक्शुअर, ट्रान्सजेन्डर) नेहमीच कार्यरत राहिली आहे. नुकताच या कम्युनिटीच्या ‘कशिश क्वीर फिल्म फेस्टिव्हल’ चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सर इयान मॅकलेन, सोनम कपूर आणि अन्य काही सेलिब्रेटिंनी उपस्थिती लावली होती.
यावेळी सोनमने आपण नेहमीच समलिंगी संबंध ठेवणा-या स्त्री आणि पुरुषांच्या हक्कासाठी लढा देणा-या समर्थकांमध्ये असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, समलैंगितकता हा मूलभूत मानवी अधिकार आहे. ही गोष्ट लेस्बिन, गे, ट्रान्स जेन्डर किंवा बाय सेक्शुअल याच्याशी जोडली गेलेली नाही. तर तुम्हाला जे बनायचे आहे त्यासाठी तुम्ही सक्षम आहात का, याच्याशी निगडीत आहे. माझ्या करियरच्या सुरुवातीपासूनचं मी या गोष्टीचे समर्थन करत आलेय. सर इयान यांनी नेहमीच एलजीबीटी कम्यूनिटीचे समर्थन केले आहे. तसेच भारतात कलम ३७७च्या विरोधात लढा देणा-यांनाही त्यांचा पाठिंबा आहे.