दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. आता तिने बॉलिवूडमध्येदेखील पदार्पण केलं आहे. नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशनवीकमध्ये तिने रॅम्प वॉक केला त्यावेळी खेळाडू शुभमन गिल विचारण्यात आले त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
शुबमन गिल मैदानात तुफानी फलंदाजीमुळे आणि मैदानाबाहेर त्याच्या वैयक्तिक लाइफमुळे चर्चेत असतो. शुभमन नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना त्याची क्रश असल्याचे सांगितले आहे. यावरून माध्यमांमध्ये चर्चा रंगली असताना पापाराझींनी रश्मिकाला कार्यक्रमानंतर विचारले की “कलाकारांप्रमाणे खेळाडूंचीदेखील क्रश आहेस,” त्यावर रश्मिकाने लाजत उत्तर देण्याचे टाळले आहे.
मध्यंतरी शुभमन गिलचा बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्याने रश्मिकाचे नाव घेतल्याने शुभमनचे चाहतेदेखील आता त्याला रश्मिकावरून ट्रोल करत आहेत.
रश्मिका मंदानाने तिच्या अभिनयाबरोबरच नृत्याने देखील सर्वांना भुरळ घातली आहे. गेल्याच वर्षी तिने ‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करत बॉलिवूडमध्येही पाऊल टाकलं. नुकताच तिचा ‘मिशन मजनू’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच लवकरच आता पुष्पा २देखील येणार आहे.