TOP 10 NEWS : मार्व्हलच्या हल्कपासून रणवीरने व्यक्त केलेल्या दिलगीपर्यंत..

आता निर्माते ‘हल्क’ला नारळ देण्याची तयारी करत आहेत.

लू फेरिग्नो

एके काळी कॉमिक्स आणि कार्टून मालिकांमधून झळकणाऱ्या सुपरहिरोंचे विश्व चित्रपट माध्यमातून आता आणखीनच विस्तृत होत चालले आहे. त्यातच नवनवीन सुपरहिरोंच्या मोठय़ा प्रमाणावर झालेल्या भरतीमुळे एखाद्या कारखान्यातून जुन्या मजुरांना काढून त्या जागी ताज्या दमाच्या नवीन कामगारांची भरती करावी त्याचप्रमाणे ‘डीसी’ आणि ‘माव्‍‌र्हल’ या सुपरहिरो कारखान्यांमधून जुन्या व्यक्तिरेखांना आता निवृत्त केले जात आहे. याची सुरुवात माव्‍‌र्हलने ‘एक्स मेन’मधील ‘सायक्लॉप्स’, ‘सब्रेतोथ’, ‘आइसमॅन’, ‘टोड’ या व्यक्तिरेखांपासून केली. पुढे ‘वूल्वरीन’सारख्या पहिल्या फळीतील सुपरहिरोला त्यांनी निरोप दिला आणि आता निर्माते ‘हल्क’ला नारळ देण्याची तयारी करत आहेत. ‘हल्क’फेम लू फेरिग्नो याने ट्वीट करून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’नंतर ‘हल्क’ कायमचा चाहत्यांचा निरोप घेणार, असे लू फेरिग्नोने केलेले ट्वीट वाचून हल्कच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.

१९६२ साली स्टॅन ली व जॅक कर्बी यांनी निर्माण केलेल्या ‘हल्क’ने कॉमिक्स आणि कार्टून मालिकांतून जबरदस्त लोकप्रियता मिळवली; परंतु चित्रपट माध्यमात ‘हल्क’ला आपले सातत्य टिकवता आले नाही. परिणामी बरोबरीचे ‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘वूल्वरीन’, ‘स्पायडरमॅन’, ‘आयर्न मॅन’ हे सुपरहिरो एकामागून एक मोठे होत असताना ‘हल्क’ मात्र तिथेच राहिला.

माव्‍‌र्हलकडून ‘हल्क’ला नारळ

शिक्षेच्या भितीने ‘मार्क सेलिंग’ची आत्महत्या

अर्धवट रोखलेला श्वास

‘आता अभिनयातलं शहाणपण आलंय..’

…म्हणून शाहिदवर आली राहते घर सोडण्याची वेळ

शाहिदबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल रणवीरने व्यक्त केली दिलगिरी

‘पॅडमॅन’ला पाकिस्तानमध्ये प्रवेश नाही

महाराष्ट्राच्या महागायकाची नवी इनिंग, आनंद शिंदे प्रथमच दिग्दर्शकाच्या भूमिकेत

राजकारणात सक्रिय होणारे रजनीकांत ‘काला’ रुपात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

मरावे परी, डिजिटलरूपी उरावे!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Top 10 news marvel hulk to ranveer singh shahid kapoor bollywood marathi gossip news