scorecardresearch

Premium

ऑस्कर २०२४ साठी ‘या’ भारतीय चित्रपटाची अधिकृत एंट्री, ज्युरींकडून घोषणा

India’s Entry in Oscar 2024: कोणत्या चित्रपटाची ऑस्कर २०२४ साठी ज्युरीने केली निवड? वाचा

Malayalam Film 2018 Is India Entry For 2024 Oscars
मल्याळम चित्रपट ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधीत्व

ऑस्कर २०२४ साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून चित्रपटाची निवड झाली आहे. यंदा एका मल्याळम चित्रपटाची निवड भारतातर्फे ऑस्करसाठी करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘2018: Everyone is a Hero’ असे आहे. या चित्रपटात टोव्हिनो थॉमसची मुख्य भूमिका आहे. हा मल्याळम चित्रपट २०२४ च्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री आहे.

आज कन्नड चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या नेतृत्वाखालील ज्युरीने ‘2018: एव्हरीवन इज ए हिरो’ चित्रपटाची निवड ऑस्करसाठी करण्यात आली आहे, अशी घोषणा केली. या चित्रपटाला नामांकन यादीत स्थान मिळाले तरच चित्रपट पुरस्कारासाठी पात्र ठरेल. ‘2018: एव्हरीवन इज अ हिरो’ हा चित्रपट केरळच्या काही भागात हाहाकार माजवणाऱ्या २०१८मध्ये आलेल्या पुराच्या पार्श्‍वभूमीवर आधारित आहे.

jab-we-met
‘जब वी मेट २’ कधी प्रदर्शित होणार? इम्तियाज अली यांनी सोडलं मौन; चित्रपटाच्या सिक्वेलबाबत माहिती देत म्हणाले…
Sshort And Ssweet movie Teaser
‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, सोनाली कुलकर्णीसह रसिका सुनीलच्या लूकने वेधलं लक्ष
ghoomer-the-kerala-story
‘घुमर’ व ‘द केरला स्टोरी’ यंदा ऑस्करसाठी जाणार? ‘या’ दिवशी फिल्म फेडरेशन जाहीर करणार चित्रपटांची यादी
jawan ott
Jawan OTT release: नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम? शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट कधी व कुठे पाहता येणार? घ्या जाणून

ऑस्कर २०२४ साठी मल्याळम चित्रपट ‘2018’ ला निवडण्यापूर्वी, ‘द केरला स्टोरी’ (हिंदी), ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ (हिंदी), ‘बालगम’ (तेलुगु), ‘वाळवी’ (मराठी), ‘बापल्योक’ (मराठी) आणि ‘१६ ऑगस्ट १९४७’ (तमिळ) या चित्रपटांबाबत विचार सुरू होता. अखेर ‘2018’ ने बाजी मारली आणि या चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलं आहे.

ज्युड अँथनी जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटात टोव्हिनो थॉमस, कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. ‘2018’ या वर्षी मे मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला समीक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही तो हिट ठरला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट आहे आणि या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tovino thomas starring malayalam film 2018 is indias entry for 2024 oscars hrc

First published on: 27-09-2023 at 13:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×